Tarun Bharat

सरकारची अवस्था नाविक नसलेल्या बोटीसारखी : दिनेश गुंडूराव

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात पावसाचा हाहाकार सुरूच. आहे. मागील वर्षी, मलनाडु, किनारी कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांना पूरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. परंतु राज्य सरकार यातून काहीच धडा घेत नसल्यामुळे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास असमर्थ असल्याने येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सरकारची अवस्था नाविक नसलेल्या बोटीसारखी झाली आहे. अशी टीका कॉंग्रेस नेते दिनेश गुंडुराव यांनीकेली आहे.

गुंडूराव यांनी भाजपा सरकार या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यात अपयशी ठरले आहे. राज्य सरकारकडे अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु सरकार यात अपयशी ठरलंय.

तयारी अभावी इथली परिस्थिती हाताबाहेर जात आहे. राज्य सरकारच्या या दुर्लक्षाची किंमत राज्यातील जनतेला मोजावी लागत आहे. मुसळधार पावसामुळे कोडगू आणि उत्तर कर्नाटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच गुंडूराव यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच राज्यातील अनेक जिल्ह्यांचे प्रभारी मंत्र्यांनी नुकतीच या भागांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. कोरोना साथीच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात या सरकारची असमर्थता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तींनी उघडकीस आणली आहे. हे सरकार दिशाहीन आणि डोकेहीन असल्याचे सिद्ध होत आहे असे ते म्हणाले.

Related Stories

माजी नगरसेवक गुंजटकर यांच्याकडून आर्थिक मदत

Amit Kulkarni

अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बसवेश्वरांचा जन्म

Amit Kulkarni

कर्नाटकात १८ वैद्यकीय संस्थामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार

Archana Banage

श्री पंत महाराजांचा उत्सव यंदा सांकेतिक स्वरुपात

Patil_p

ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र देताना आयकर खात्याकडून एनओसी घ्या

Amit Kulkarni

बेळगावच्या रताळय़ाला वाढली मागणी

Omkar B