Tarun Bharat

सरकारची स्थानिकांप्रती असंवेदनशीलता पुन्हा उघड

Advertisements

निवडणुकीसाठी आणल्या अन्य राज्यातून टॅक्सी : आप नेते सिद्धेश भगत यांची सरकारवर टीका

प्रतिनिधी /पणजी

राज्यात निवडणूक कामासाठी शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून टॅक्सी आणण्यात आल्याने आम आदमी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गोव्यात मोठय़ा संख्येने टॅक्सी असताना मुद्दाम बाहेरून टॅक्सी आणि भाडोत्री गाडय़ा का आणण्यात आल्या? असा सवाल आपचे युवा नेते सिद्धेश भगत यांनी उपस्थित केला आहे. ’मिशन कमिशन’च्या नादात सरकार स्थानिक टॅक्सी चालकांना डावलत असल्याचा संशय भगत यांनी व्यक्त केला आहे. धंदा नसल्यामुळे स्थानिक टॅक्सी वाल्यांची कुटुंबे उघडय़ावर पडलेली असताना सरकार एवढे असंवेदनशील कसे असू शकते, असेही भगत यांनी म्हटले आहे.

आज निवडणूक जवळ आलेली असताना ’स्वयंपूर्ण गोव्याच्या’ गप्पा मारणारे भाजप नोकऱया निर्माण करताना कुठे गायब झाले होते? राज्यात टॅक्सी ऑपरेटर असताना बाहेरच्या लोकांना किफायतशीर टॅक्सी व्यवसाय का आणि कसा मिळतो?, असे सवाल भगत यांनी केले.

एका टॅक्सी चालकासाठी प्रतिदिन 4500 रुपये देण्यात येणार आहेत. याचा अर्थ जर रोज 50 टॅक्सी चालक असतील तर त्यांचे 4.5 लाख रुपये होतील, आणि 26 दिवसांसाठी ते रु. 1.17 कोटी रुपये होतील. तेवढेच पैसे राज्यातील तरुणांच्या खात्यात जमा झाले असते तर सर्वांनाच दिलासा मिळाला असता, परंतु राज्य सरकारने ही संधी बाहेरच्यांना दिली, असा आरोप भगत यांनी केला.

राज्य सरकार हे कमिशनचे सरकार बनले आहे. बाहेरच्या लोकांना किफायतशीर व्यवसाय देणारे कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक वेळी राज्य सरकार सामाजिक कार्यक्रम आयोजित करते तेव्हा बाहेरील उद्योगांना फायदा होतो, त्यामुळे त्यांना कमिशन मिळते असे भगत पुढे म्हणाले.

आपचे नेते चेतन कामत यांनीही बाहेरच्या लोकांना व्यवसाय दिल्याने नाराजी व्यक्त केली. गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून 50 हून अधिक पर्यटक इनोव्हा वाहने मागवली आहेत. स्थानिकांना व्यवसाय देण्याऐवजी आयोगाने तो बाहेरच्यांच्या घशात घातला. हा मोठा अन्याय आहे, असे ते म्हणाले.

या महामारीच्या काळात गोव्यातील लोकांच्या हाती असलेला एकमेव व्यवसाय म्हणजे टॅक्सी व्यवसाय. सध्या तो धोक्मयात आला आहे. गोव्यात पर्यटकांसाठी अधिक आलिशान वाहने उपलब्ध असताना, राज्य निवडणूक आयोगाने बाहेरील लोकांकडून वाहने भाडय़ाने का मागवली?, असा संतप्त सवाल कामत यांनी उपस्थित केला.

Related Stories

‘सरकार तुमच्या दारी’च्या यशामुळे विरोधक अस्वस्थ

Patil_p

गोवा फॉरवर्डसाठी माजी आमदार मायकल लोबो मैदानात

Sumit Tambekar

नगरसेवक महेश आमोणकरकडून मडगावात घरोघरी प्रचारावर भर

Amit Kulkarni

एमडीच्या नियुक्तीवरून गोवा डेअरीची आमसभा चर्चेविना रद्द

Amit Kulkarni

पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर नाहीच

Patil_p

म्हापशासाठी भाई पंडितांचे योगदान महत्त्वाचे : मंत्री लोबो

Amit Kulkarni
error: Content is protected !!