Tarun Bharat

सरकारच्या गोमंतकीयविरोधी धोरणांना विरोध करण्याची गरज

आमदार विजय सरदेसाई यांचे आमदार विजय सरदेसाई यांचे उदगार  मार्ग ट्रस्टने उभारलेल्या फलकांचे अनावरण

प्रतिनिधी/ मडगाव

मार्ग ट्रस्ट, मडगाव यांच्यातर्फे सासष्टी तालुक्मयात तीन ठिकाणी ‘देव बरें करूं’ असा संदेश लिहिलेले फलक उभारण्यात आले आहेत. यापैकी कदंब बसस्थानकाच्या शेजारील फलकाचे अनावरण केल्यावर आपल्या भाषणात फातोर्डाचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, की ‘देव बरें करूं’ याचा थेट संबंध आपल्या पक्षाच्या ‘गोंय, गोंयकार व गोंयकारपण’ या घोषणेशी आहे. सध्या गोव्यात सरकारतर्फे गोमंतकीयविरोधी धोरणे राबविली जात असून आपण सर्वांनी एकजुटीने त्यास विरोध करणे ही काळाची गरज आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे लवकरच फातोर्डा मतदारसंघात असे आणखी फलक उभारण्यात येतील, अशी घोषणा सरदेसाई यांनी यावेळी केली. मडगावात या फलकाचे अनावरण केल्यावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, गुरुनाथ केळेकर हे 92 वर्षांचे तरुण मार्गशी संबंधित कामे गेली अनेक वर्षे झपाटल्यागत करत आहेत. त्यांचा हा उपक्रम गोमंतकीय आतिथ्यशीलतेचाच एक भाग आहे. गोव्यात येणाऱया प्रत्येकाला ‘देव बरें करूं’ असे म्हणणे ही आपली संस्कृती असून एका अर्थाने हा आपल्या संस्कृतीचाच प्रचार व प्रसार आहे.

मार्ग ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले की, ट्रस्टतर्फे असे फलक संपूर्ण गोव्यात उभारण्याचा मानस आहे. बाकभाट-राय येथील फलकाचे अनावरण कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केले. मार्ग ट्रस्टचे पदाधिकारी दिलीप प्रभुदेसाई व अनंत अग्नी हेही यावेळी उपस्थित होते.

Related Stories

राज्यातील गुंडगिरीचा पूर्णपणे बिमोड केला जाईल

Patil_p

आप करणार आश्वासनांची वचनपूर्ती : म्हांबरे

Amit Kulkarni

धर्मा भोमकर यांचे निधन

Omkar B

बार्से येथे कंटेनरला पाठीमागून धडक, दोन्ही वाहनांची हानी

Patil_p

निवृत्त न्या. बेला नायक आज घेणार ग्राहक मंच अध्यक्ष पदाचा ताबा

Amit Kulkarni

उपराष्ट्रपती नायडू आज गोवा भेटीवर

Amit Kulkarni