Tarun Bharat

सरकारच अमली पदार्थ व्यवसायात

आमदार विनोद पालयेकर यांचा आरोप

प्रतिनिधी / पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे सरकारच अमली पदार्थ व्यवहारात सामील असून ते हा व्यवसाय चालवत असल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉ. सावंत यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे आणि विश्वजित राणे किंवा मायकल लोबो यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी आमदार पालयेकर यांनी केली आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पालयेकर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे नशामुक्त भारतासाठी आवाहन करतात तर इकडे गोव्यात रेव्ह पार्टी, अमली पदार्थ यांचा धुमधडाका सुरू आहे. अभिनेता कपिल झवेरी हा त्या रेव्ह पार्टीत सापडतो आणि त्याचे मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो प्रसारीत होतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. राजकारणी अभिनेता यांचे लागे-बांधे कुठेतरी आहेत आणि त्याचा संबंध अमली पदार्थाशी आहे, हेच त्यातून समोर येत असल्याचा दावा आमदार पालयेकर यांनी केला आहे.

अंजुणा पोलीस निरीक्षकांना निलंबित करा ः आमदार पालयेकर

अंजुणा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस यांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. परंतु ती मान्य होत नाही. तेथील पोलीस उपनिरीक्षक विगेश पिळगावकर हे तर सरकारी जावईच असून त्यांची बदली केली तरी ते पुन्हा अंजुणा पोलीस स्थानकात हजर होतात. हे सर्व राजकारण्यांच्या आशीर्वादाने होत आहे. वागातोर रेव्ह पार्टीत एवढी मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ कसे आले ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आमदार पालयेकर यांनी केली आहे. उपनिरीक्षक पिळगावकर हे ड्रग्जवाल्यांमध्ये सामील असल्याची उदाहरणे देत उपनिरीक्षक पिळगावकर हे त्यांच्यासमवेत फिरत असतात, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे अमली पदार्थ, रेव्ह पाटर्य़ा रोखण्यात अपयशी ठरले असून तेच त्यात सामील असल्याचे दिसून येत असल्याचा दावाही आमदार पालयेकर यांनी केला.

Related Stories

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी कामरखाजन येथे नागरिक उतरले रस्त्यावर

Patil_p

कुळे पाईटी हायस्कूल पा. शि.संघ अध्यक्षपदी दिनेश देसाई

Amit Kulkarni

धारगळ येथे ‘डेल्टा’ ला 3.82 लाख चौ.मी.जमीन

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये चर्चिल-ट्राव लढत बरोबरीत; चेन्नईनचा विजय

Amit Kulkarni

फोंडय़ात तालावांच्या रूपात मानसिक तणाव देतात वाहतूक पोलीस

Amit Kulkarni

प्रियोळचा आमदार स्थानिकच हवा !

Amit Kulkarni