Tarun Bharat

सरकारने नोकऱयांसाठी पैसे घेतल्याचे सिध्द करून दाखवा

प्रतिनिधी/ पणजी

काँग्रेस नेत्यांनी नोकऱयासंदर्भात सावंत सरकारवर वृथा आरोप करू नयेत. ते एकतर सिध्द करावेत किंवा नोकऱयांसाठी जर कोणी पैसे घेतले असतील तर स्पष्टपणे त्यांची नावे सांगावीत. उगाच हवेत बाण मारू नयेत, बेताल, बिनबुडाचे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा भजपचे सरचिटणीस दामू  नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्य सरकारने नोकऱया विक्रीस काढल्या आणि कमाई केल्याची टीका कांग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली होती. त्याचा समाचार नाईक यांनी घेतला.

भाजप सरकार दहा हजार नोकऱयांची भरती करते हे काँग्रेस पक्षाला खुपत आहे. नोकर भरतीमुळे सरकारची प्रतिमा उंचावणार असल्याने उगाच फ्ढालतू आरोप करून ती डागाळण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असल्याचे नाईक यांनी नमुद केले आहे.

काँग्रेस पक्ष चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत आहे. त्यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, असे  आवाहन दामू नाईक यांनी केले.

Related Stories

हणजुणेत 10 लाखांचा ड्रग्स जप्त

Omkar B

राजकारणाच्या डावात मायकल लोबो अखेर सफल

Amit Kulkarni

रामको सिमेंट कंपनीतर्फे तामिळनाडूत निर्जंतुकीकरण बोगदा

Omkar B

मगो नेते सुदिन ढवळीकरांची मागणी

Omkar B

ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे सूचित करणार

Amit Kulkarni

खंडित विजेच्या समस्येमुळे मोले, कुळेतील नागरिक आक्रमक

Patil_p