Tarun Bharat

सरकारवर अवलंबून राहू नका : सरदेसाई

Advertisements

सामुदायिक संसर्गास सुरुवात, प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी

प्रतिनिधी / मडगाव

राज्यात कोविड-19 चा सामुदायिक संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक गोमंतकीयाने स्वतःची काळजी स्वतःच घेणे आवश्यक आहे. सरकारवर आता अवलंबून राहता कामा नये, असे मत गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने सोमवारी कोविड-19 मुळे पहिला बळी गेल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. सरकार खलाशांकडून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करत होते. मात्र बहुतांश खलाशांचे कोविड चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.

कोविडचा सामाजिक संसर्ग होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने प्रत्येकाने अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक बनले असून मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सेनिटायजरचा वेळोवेळी वापर करणे अशा गोष्टींवर जास्त भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोविड-19 हा साधा ज्वर आहे या सरकारच्या सांगण्यावर भरवसा ठेवू नका व सर्वतोपरी काळजी घ्या, असे आवाहन सरदेसाई यांनी गोमंतकीय जनतेला व खास करून फातोर्डावासियांना उद्देशून केले आहे.

फातोर्डा स्टेडियममध्ये कोविड केंद्र साकारणार

फातोर्डा मतदारसंघासाठी वेगळे कोविड केंद्र असणे आवश्यक आहे. याअनुषंगाने दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याशी आपली बोलणी झाली असून फातोर्डा स्टेडियममध्ये कोविडच्या रुग्णांसाठी 75 खाट‍ांचे एक केंद्र उभारण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सरदेसाई यांनी दिली.

Related Stories

मोन्सेरात गटाच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका

Amit Kulkarni

“नवा सोमवार” उत्सवासाठी डिचोलीवासीय सज्ज

Amit Kulkarni

आपल्या राज्यात जाण्यासाठी वास्को रेल्वे स्थानकात परप्रांतीयांचा जमाव

tarunbharat

मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करताय; ही काळजी घ्या…

Kalyani Amanagi

नऊ महिन्यांच्या बालिकेवर मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी

Amit Kulkarni

माजी आमदार लवू मामलेदार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!