Tarun Bharat

सरकारी खात्यांत 10 हजार पदे भरणार

Advertisements

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून क्रांतिदिनी विविध घोषणा : ऑनलाईन माध्यमातून जनतेशी साधला संवाद

प्रतिनिधी / पणजी

विविध सरकारी खात्यातील सुमारे 10 हजार रिक्त पदे येत्या सहा महिन्यांत भरण्यात sयेणार असून आर्थिकदृष्य़ा दुर्बल कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास त्या कुटुंबास रु. 2 लाख अनुदान मिळेल तसेच लहान उपेक्षित व्यावसायिकांना रु. 5,000 ची आर्थिक मदत देण्यात येईल. त्याचे अर्ज आठ दिवसांत उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा क्रांतिदिनानिमित्त राज्यातील जनतेला ऑनलाईन माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, सरकारमधील 10,000 जागांची भरती आगामी सहा महिन्यांत होणार असून जाहिरात केलेल्या, न केलेल्या पदांचा समावेश आहे.

कोरोनामुळे ज्यांना फटका बसला आहे. अशा विविध पारंपरिक व्यावसायिक, मनरेगा कामगार, स्वयंरोजगार करणारे अशा सर्वांना रु. 5000 ची मदत मिळणार आहे.

‘भूमी अधिकार विधेयक’ची अंमलबजावणी

राज्यातील जुवारी पूल, पेडणे ते काणकोण राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. गोमंतकातील जनतेला त्यांचे घर, जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी हक्क मिळावा म्हणून ‘भूमी अधिकार विधेयक’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे घरे, जागा नावावर करण्यास सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासगी विद्यापीठातील विधेयका अंतर्गत राज्यात 3 खासगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. शिक्षणात कोडिंग रोबोटिक योजनेचा समावेश करण्यात येणार आहे. आगामी 6 महिन्यांत गोव्यात सर्व क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा इरादा त्यांना प्रकट केला.

सात लाख लोकाना लसीचा पहिला डोस

आतापर्यंत 7 लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून गोव्याची अर्धी लोकसंख्या त्यात समाविष्ट झाली आहे. 30 जुलैपर्यंत उर्वरित लोकसंख्येला पहिला डोस देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करू, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

 ‘आत्मनिर्भर स्वयंपूर्ण’ची क्रांती घडविणार! गोमंतकीय जनता, आमदार, मंत्री व सहकार्याने राज्य ‘आत्मनिर्भर स्वयंपूर्ण’ अशी क्रांती करणार असल्याची आशा डॉ. सावंत यांनी जनतेशी संवाद साधताना बोलून दाखविली. स्वच्छ-सुंदर गोवा तयार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे. 18 जून 1946 रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यासाठी क्रांतीची ज्योत पेटविली. त्या क्रांतिदिनास आज 75 वर्षे पूर्ण होत असून गोव्याने सर्वच क्षेत्रात क्रोता घडविली आहे. ती क्रांती आणखी पुढे नेण्यासाठी गोमंतकीय जनता पुन्हा एकदा आपणास संधी देईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

Related Stories

सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलला आग

Patil_p

स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसाठी उपोषण करणार

Amit Kulkarni

पणजीत वाहतूक कोंडी वाढली !

Amit Kulkarni

पंचवाडी जलप्रकल्पात अमोनिया गॅसगळती

Omkar B

‘गोय स्वातंत्र्याचे होमखण’ माहिती पट सीडीचे प्रकाशन

Amit Kulkarni

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे काणकोणात काँग्रेसकडून दहन

Patil_p
error: Content is protected !!