Tarun Bharat

सरकारी-खासगी क्षेत्रातील स्वच्छता कामगारांचे होणार सर्वेक्षण

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱया कामगारांच्या समस्या सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रात स्वच्छतेचे काम करणाऱया कामगारांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी व खासगी क्षेत्रात स्वच्छता काम करणाऱया आजी-माजी कामगारांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

महापालिकेत स्वच्छता कामगार म्हणून निवृत्त झालेले असंख्य कामगार घरकुल सुविधेपासून वंचित आहेत. स्वच्छतेचे काम करणाऱया कामगारांना घरे देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. काही ठरावीक महापालिकेतील कामगारांना घरकुलाची सुविधा मिळाली. मात्र बेळगाव महापालिकेतील स्वच्छता कामगार घरकुल सुविधेपासून वंचित आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात अनेक कामगार स्वच्छतेची सेवा बजावत आहेत. त्यांना शासनाकडून कोणतीच सुविधा मिळत नाही. त्यामुळे स्वच्छता कामगारांना शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी समाजकल्याण खात्याच्या बैठकीवेळी विविध स्वच्छता कामगार संघटनांनी केली होती. याची दखल घेऊन सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱया कामगारांचे सर्वेक्षण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

त्यामुळे महापालिकेच्यावतीने वॉर्डनिहाय अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची नियुक्ती करून स्वच्छता कामगारांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येकी दहा वॉर्डना एक याप्रमाणे सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी व खासगी क्षेत्रात स्वच्छता कामगार म्हणून सेवा बजावत असल्यास त्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांना मिळणाऱया सुविधा आणि असुविधांची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी सेवेतील सेवानिवृत्त स्वच्छता कामगारांची आणि त्यांच्या वारसदारांची माहिती घेण्यात येणार आहे.

शहराच्या स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जीव धोक्मयात घालून काम करणारे कामगार सरकारी सुविधांपासून वंचित आहेत. गरजूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वेक्षणाची मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. 

Related Stories

कचरा विल्हेवारीसाठी हॉटेल चालकांना सूचना

Amit Kulkarni

खासबाग येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Omkar B

चार महिने पूर्ण, तरीही सर्व्हरची समस्या जैसे थे

Amit Kulkarni

जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

Patil_p

खानापूर म.ए. समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni
error: Content is protected !!