Tarun Bharat

यापुढे सरकारी प्रशिक्षण बार, रेस्टॉरंटमध्ये ठेवा : आशिष शेलार

ऑनलाईन टीम / मुंबई : 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरू असलेले मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱयांचे प्रशिक्षण दुसऱया दिवशी बंद करण्यात आले आहे. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरसे किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये घ्यावीत, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही म्हटले आहे.

शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱयांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी आयोजित केले होते. मात्र, काँग्रेसने आक्षेप घेतल्याने हे प्रशिक्षण दुसऱया दिवशी बंद करण्यात आले. ही बाब खेदजनक आहे.

अधिकाऱयांचे प्रशिक्षण हे कायद्याविषयीचे होते. हे कोणत्याही राजकीय विचारांनी प्रेरित होण्यासाठी नव्हते. त्यामुळे हे प्रशिक्षण रद्द करुन काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरसे किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये घ्यावीत.

Related Stories

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत

Archana Banage

सीएम ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बैठकीत काय सूचना केल्या ?; राजेश टोपेनीं दिली माहिती

Archana Banage

…तर आज आपल्याला राममंदिर भूमिपूजनाचा दिवस पाहताच आला नसता : संजय राऊत

Tousif Mujawar

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी

datta jadhav

राजस्थान : न्यायाधीशानेच केला लैंगिक अत्याचार

Archana Banage

महागाईचा भडका : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ

Tousif Mujawar