Tarun Bharat

सरकारी वसतीगृहात शिपायाची आत्महत्या

पोटदुखीला कंटाळून संपविले जीवन

प्रतिनिधी / बेळगाव

पोटदुखीच्या आजाराला कंटाळून सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका शिपायाने सरकारी वसतीगृहातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

अशोक सिध्दलिंगाप्पा मुकण्णावर (वय 48) असे त्या दुर्दैवीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अशोक यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवले असून पोटदुखीच्या आजाराला कंटाळून आपण जीवन संपवित आहोत. आपल्या मरणाला आपणच कारणीभूत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पत्नी गावी गेली आहे. सकाळी अशोक यांच्या पत्नीने त्यांना फोन केला. वारंवार संपर्क साधूनही त्यांनी घेतला नाही म्हणून काय झाले हे बघण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला पाठवून दिले. त्यावेळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Related Stories

प्रज्ञानंदची अनिश गिरीवर मात

Patil_p

उचगाव येथे खुल्या जीमचे उद्घाटन

Omkar B

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 63.47 लाख देण्याचे आदेश

Patil_p

मान्सून कर्नाटकात दाखल

datta jadhav

विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी घेतला मनसोक्त आस्वाद

Omkar B

मनपाचा पहिला बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

Amit Kulkarni
error: Content is protected !!