Tarun Bharat

सरन्यायाधीशांनी सीबीआयच्या विश्वासार्हतेवर व्यक्त केली चिंता; म्हणाले…!

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. परंतु केंद्रातील भाजपा सरकारकडून मात्र त्याचा निषेध केला जात आहे. इडी, सीबीआय, आयकर विभाग अशा तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळींच्या घरी टाकलेल्या छाप्यांनंतर मोदी सरकारवर जास्तच टीका होऊ लागली आहे. अशातच खुद्द देशाचे सरन्यायाधीश एन. वही. रमणा यांनीच प्रमुख केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या विश्वासार्हतेविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या सर्व तपास यंत्रणावर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा उभी करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

एनव्ही रमणा यांनी देशाची मुख्य तपास यंत्रणा सीबीआयला सल्ला देताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सीबीआयच्या हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि दिरंगाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे न्यायमूर्ती रमणा यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगितले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. अनेकदा पोलीस अधिकारी आमच्याकडे येऊन अत्याचार होत असल्याचे सांगतात. राजकीय प्रतिनिधी बदलत राहतात पण तुम्ही सदैव सेवेत आणि कर्तव्यात राहाल, अशा शब्दांत रमणा यांनी सीबीआयला खडेबोल सुनावले.

विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश रमणा यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारतातील पोलीस व्यवस्थेत केव्हा आणि किती बदल झाला यावर भर दिला. पण कालांतराने सीबीआयसारख्या तपास यंत्रणा सार्वजनिक निगराणीखाली आल्या आहेत. सरन्यायाधीश म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारे आपला छळ करतात, अशा तक्रारी घेऊन अनेकदा पोलीस अधिकारी आमच्याकडे येतात, असे रमणा म्हणाले.

“सीबीआयवर लोकांचा प्रचंड विश्वास होता…”
सुरुवातीच्या काळात सीबीआयवर लोकांचा प्रचंड विश्वास होता, असं न्यायमूर्ती रमणा म्हणाले आहेत. “सीबीआयवर लोकांचा खूप विश्वास होता. खरंतर स्वतंत्र यंत्रणा आणि पारदर्शी कारभार यामुळे सीबीआयकडे प्रकरण वर्ग करण्यासाठी न्यायव्यवस्थेकडे मोठ्या संख्येनं विनंती येत होत्या. जेव्हा जेव्हा नागरिकांना स्थानिक पोलिसांच्या पारदर्शी तपासावर विश्वास राहिला नाही, तेव्हा लोकांनी न्याय मिळवण्यासाठी सीबीआय तपासाचीच मागणी केली आहे”, असं रमणा म्हणाले. १ एप्रिल रोजी सीबीआय स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

Related Stories

उत्तराखंडातील कोरोना : मागील 24 तासात 990 जणांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.07%

Rohan_P

मिशन ऍडमिशन! आयटीआयची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

Abhijeet Shinde

मोदींनाही द्यावे लागणार ‘नो-कोविड’ प्रमाणपत्र

Patil_p

संशयित चिनी सैनिक ताब्यात

Patil_p

साताऱ्यात आज ४३ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

ममतांच्या पुतण्याला ईडीकडून समन्स जारी

Patil_p
error: Content is protected !!