Tarun Bharat

सरबजीत सिंह यांच्या भगिनी कालवश

Advertisements

पाकिस्तानात कैद भावाच्या सुटकेसाठी केले होते प्रयत्न

वृत्तसंस्था/ भीखीविंड

पाकिस्तानच्या तुरुंगात हिंसक हल्ल्यात जीव गमावणाऱया सरबीत सिंह यांच्या भगिनी दलबीर कौर यांचे शनिवारी रात्री निधन झाले आहे. पंजाबच्या तरनतारन जिल्हय़ातील भीखीविंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सरबजीत सिंह हे पंजाबच्या तरनतारन जिल्हय़ातील भीखीविंडचे रहिवासी होते. सरबजीत यांनी चुकुन पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला होता.  1991 मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना हेरगिरीचा ठपका ठेवून मृत्युदंड ठोठावला होता.

सरबजीत हे 22 वर्षे तुरुंगात होते, या काळात त्यांच्या ज्येष्ठ भगिनी दलबीर कौर यांनी स्वतःच्या भावाच्या मुक्ततेसाठी मोठा संघर्ष केला होता. माझा भाऊ सरबजीत निर्दोष असल्याचे त्यांचे म्हणणे होते. भावाची भेट घेण्यासाठी त्या पाकिस्तानातही गेल्या होत्या.

सरबजीत सिंह हे ऑगस्ट 1990 मध्ये चुकून पाकिस्तानच्या हद्दीत दाखल झाले हेते. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी त्यांना अटक केली होती. पाकिस्तानात सरबजीत यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. रॉचा हस्तक ठरवत त्यांना लाहौर, मुल्तान आणि फैसलाबाद येथील स्फोटांचे आरोपी करण्यात आले होते.

सरबजीत यांच्या शिक्षेच्या विरोधात अनेक मानवाधिकार संघटनांनी आवाज उठविला होता. एप्रिल 2013 मध्ये लाहोरच्या कोर्ट लखपत तुरुंगातील कैद्यांनी सरबजीत यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. जखमी सरबजीत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 मे 2013 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. सरबजीत यांच्या मृत्यूनंतर पंजाब सरकारने तीन दिवसांच्या राजकीय शोकाची घोषणा केली होती.

Related Stories

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला, जवान हुतात्मा

Patil_p

आयटीबीपीच्या श्वानपथकात 16 नवे सदस्य

Omkar B

‘डेल्टा प्लस’संबंधी `या’ राज्यांना केले सतर्क

Amit Kulkarni

हवाई दलाला मिळणार सर्वात हलके हेलिकॉप्टर

Patil_p

‘पीएम केअर फंड’च्या वापरासंबंधी याचिका

Patil_p

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Patil_p
error: Content is protected !!