Tarun Bharat

सरवडे येथे दूधगंगा नदीत आढळला मृतदेह

Advertisements

प्रतिनिधी / सरवडे

सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५-४० वर्षाचे पूर्णतः सडलेला व लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह सापडला आहे.मृतदेह पूर्णतः सडलेले असल्याने जागेवरच पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटणे मुश्किल झाले आहे.या घटनेची नोंद मांगेवाडीच्या पोलीस पाटील वंदना गुरव यांनी राधानगरी पोलीसांत केली आहे.

घटनास्थळ व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, सरवडे येथील दूधगंगा नदीपात्रात मांगेवाडी हद्दीत शेतातील लोकांना पाण्यात तरंगणारे प्रेत दिसले. याची खबर पोलीस पाटील सौ.गुरव यांना देण्यात आली. मृतदेह प्लास्टिक बारदानात गुंडाळून कंबर, छाती, खांद्याला दोरी, लोखंडी तार तसेच मोठमोठी दगडे बांधलेल्या व सडलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत होता. तो सडलेल्या अवस्थेत असल्याने पाण्याबाहेर जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला.

सडलेल्या मृतदेहाचा डॉक्टरांच्या पथकाने जागेवरच पंचनामा केला. डॉक्टर व पोलिसांनी प्राथमिक अंदाजाने मृतदेह पुरुष जातीचा व ३५-४० वयाचा असल्याचे सांगितले. तरीही पुरुष की स्त्री ठरवणे अवघड झाल्याने काही अवशेष पुढील तपासासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले. पोलिसांनी हा खून अथवा घातपाताचा संशय व्यक्त करुन प्रेताची विल्हेवाट लावण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

तसेच ८-१०दिवसात कोणतीही मिसिंग तक्रार नोंदवली नसल्याचे सांगितले. ही घटना गंभीर असून याबाबत कोणास माहिती द्यायची असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हान आहे.या घटनेची नोंद राधानगरी पोलीसांत झाली असून पोलीस निरीक्षक उदय डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

Related Stories

महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी शरद पवार आखाड्यात !

Abhijeet Khandekar

स्थानिकांना रोजगारासाठी सहकार्य करा

Archana Banage

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Archana Banage

`स्कूल कनेक्ट’ची `पॉलिटेक्निक’ला `पॉवर’!

Archana Banage

आरके नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली चार दुकानं

Abhijeet Khandekar

चरस विक्रीसाठी आलेला रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Archana Banage
error: Content is protected !!