Tarun Bharat

सरसकट कर्जमाफीसाठी भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी / कोल्हापूर

  सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी आज, मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विराट मोर्चा’ काढण्यात आला. दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा जाणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा होणार असून भाजपचे राज्यभरातील नेते मार्गदर्शन केले.

कर्जमाफीची घाईघाईने घोषणा करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व दोन लाखावर तसेच शेतीपूरक मध्यम मुदत कर्जबाबत काही निर्णय घेतले नाहीत सरसकट कर्जमाफी ही शब्दरचना केवळ नावापुरतीच आहे साखर कारखाने, सूतगिरण्या नागरी बँका, बाजार समिती, जिल्हा बँक, या पदाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 25000 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आले आहे शेतकरी पात्र होण्यासाठी मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्जाचा फेरविचार करण्याची गरज आहे आदी मागन्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मोर्चात माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेतील गटनेते अरुण इंगवले, पक्ष परतोद विजय भोजे ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शोमिका महाडिक गोकुळचे संचालक बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, आदी मोर्चात सहभागी झाले होते.

Related Stories

राष्ट्रवादीची ‘स्वाभिमानी’ला आमदारकीची ऑफर

Archana Banage

भाजपचे ‘मिशन टेन प्लस टू’ पण….?

Archana Banage

संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबाबतचे ‘ते’ विधान मागे

prashant_c

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा ईडीचा छापा

Archana Banage

कोल्हापूर : खोकुर्ले येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

Archana Banage

कोल्हापूर : रुईत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Archana Banage