Tarun Bharat

सरस्वती वाचनालयाचा आधारस्तंभ हरपला

सरस्वती वाचनालयातर्फे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे सरस्वती वाचनालयाचे आधारस्तंभ होते. या वाचनालयासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. ते शब्दाचे पक्के होते. त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाळला असता. त्यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ गेला आहे, अशा शब्दात सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शहापूर कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयातर्फे शनिवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, संचालक जगदीश कुंटे,आर. एम. करडेगुद्दी, विजय देशपांडे उपस्थित होते.

स्वरुपा इनामदार म्हणाल्या, सरस्वती वाचनालय 2005 पासून हिंडलगा कारागृहात सावरकर पुण्यतिथीचे आयोजन करते. यावषी परवानगी मिळत नव्हती. परंतु सुरेश अंगडी यांनी आपण त्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले आणि त्यांनी शब्द दिल्यानुसार आम्हाला ही पुण्यतिथी करण्यासाठी परवानगीही मिळवून दिली. वाचनालयासाठी अर्थसाहाय्य करण्याचे माझ्या लक्षात आहे. कोरोनाचे संकट संपले की मी स्वतः येतो, असे 15 दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले होते. मात्र दुर्दैवाने ते आकस्मिक आपल्यातून निघून गेले, हे वास्तव आहे. परंतु आमच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, असे सांगितले.

अंगडी या शब्दाचा कानडी अर्थ दुकान असा आहे. मात्र सुरेश अंगडी यांनी राजकारणात दुकानदारी केली नाही. सर्वांना सोबत घेऊन विकास, असे त्यांचे सूत्र होते. त्यांच्या आकस्मित निधनाने एक चांगली व्यक्ती आपण गमावली आहे. 2004 मध्ये सुरेश अंगडी प्रथम निवडून आले. त्यावेळी ज्ये÷ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रभावाचा व पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा, प्रतिमेचा त्यांना उपयोग झाला. परंतु अंगडी यांनी ती प्रतिमा टिकविली आणि उंचावली, असे मत व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी व्यक्त केले.

आर. एम. करडेगुद्दी म्हणाले, सुरेश अंगडी यांनी मंत्री झाल्यावर वेगाने काम सुरू केले होते. बेळगाव-धारवाड मार्गावर रेल्वेसेवा सुरू करून त्यांनी जनतेची मोठी सोय केली. अनेक संघ-संस्थांना त्यांनी मदत केली. पण जीवन किती क्षणभंगूर आहे हेच त्यांच्या निधनाने आपल्या लक्षात येते, असे सांगितले.

राजेंद्र केळकर म्हणाले, सरस्वती वाचनालयाला सुरेश अंगडी यांचा नेहमीच पाठिंबा आणि हातभार लागला होता. वाचनालयाच्या अनेक उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिला, असे सांगितले. मनीषा सुभेदार यांनी, लॉकडाऊन काळामध्ये एका लहान बाळाला पुण्यामधून औषधे आणून देण्यासाठी सुरेश अंगडी आणि अनिष हेगडे या दोघांनी धडपड केली आणि त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वेची सुविधाही सुरू केली, याची आठवण सांगितली.

यावेळी विश्वस्त सुभाष इनामदार, संचालक गणेशवाडी, प्रियांका केळकर, गणेश कुबेरवाडी, आनंद कुलकर्णी, अमोल जैन, सविता पारनट्टी, जयश्री सुतार आदी उपस्थित होते.

Related Stories

कोचरीत 6 दिवसांनंतर मगरीला पकडण्यात यश

Amit Kulkarni

महापालिकेच्या शववाहिकेची दुर्दशा

Omkar B

वळीव पावसाने तालुक्मयाला पुन्हा झोडपले

Omkar B

खानापूर तालुक्यात एकाच दिवसात विक्रमी कोरोनाबाधित

Patil_p

वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार

Amit Kulkarni

अतिवाडात ‘लाळय़ा खुरकत’ची लागण

Amit Kulkarni