Tarun Bharat

सराटी तलाव फुटून शेतीचे नुकसान

तलाव दुरुस्त करण्याची मागणी ः बांधाला लागल्या घुशी

प्रतिनिधी/कवठेमहांकाळ

सराटी येथील पाण्याने तुडुंब भरलेला तलाव अखेर फुटला. तलावाच्या बांधाला लागलेल्या घुशी आणि झाडाझुडपांनी वेढलेला हा तलाव आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्याने नुकत्याच भरून घेतला होता. तलावाला शनिवारी सकाळी भगदाड पडले आणि शेतकऱयांची एकच भंबेरी उडाली. सगळेच पाणी बाहेर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सराटीच्या पश्चिमेचा लोहार तलाव पाण्याच्या प्रवाहाने फुटला. अर्धा किलोमीटर लांब, अर्धा किलोमीटर रुंद व तीस फूट खोल तलाव होता. अनेक दिवसांपासून येथे घुशी लागल्या होत्या, तसेच तलावाच्या बांधाजवळ आणि मध्यभागी लहान-मोठÎा झाडांची बेटे निर्माण झाली होती, त्यामुळे तलावाचे बांध भुसभुशीत होण्याचे प्रमाणही वाढले होते. तलावाच्या आजूबाजूस शेत जमिनी आहेत, शिवाय म्हैसाळ योजनेचा मुख्य कालवाही जवळच आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने हा तलाव नेहमीच भरला जातो व त्याचा फायदा शेतकऱयांना होतो.

सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू असून तलाव पाण्याने भरून घेण्यात आला आहे. मोठÎा प्रमाणात पाणी आल्याने आणि अगोदरच बांध भुसभुशीत झाल्याने शनिवारी सकाळी मोठÎा लोंढÎाने पाणी बाहेर पडू लागले. येणाऱया पाण्याचा प्रवाह ओढÎाकडे वळवण्यात आला.   

तलाव फुटल्याने आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. अविनाश पवार, प्रवीण पवार, रमेश पवार, काशिनाथ पवार, जयश्री पवार, शंकर पवार या शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले आहेत, अशी माहिती राजू पोतदार यांनी दिली.

सराटी परीसरातील शेती या पाण्यावरच होते. काही दिवसांपूर्वीच तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरून घेतला होता. मात्र आता पुढच्या काळात शेतीला पाणी कमी पडणार आहे. म्हैसाळचे पाणी सुरू आहे तोपर्यंत पाटबंधारे विभागाने तलाव दुरूस्ती करुन भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

सांगली : कारागृहात उद्रेक, 62 कैदी पॉझिटिव्ह

Archana Banage

मिरजेत कोरोनाचा कहर, रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

Archana Banage

सांगली : कोरोनाने दोन बळी, नवे रूग्ण २३

Archana Banage

सांगली : इस्लामपुरातील डॉ. सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलची कसून चौकशी

Archana Banage

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

Archana Banage

सांगली : दीड दिवसाच्या गणपतीला निरोप

Archana Banage