Tarun Bharat

सराफाच्या कारची काच फोडून 22 तोळय़ाचे दागिने पळविले

Advertisements

शहापूर येथील घटनेने खळबळ, केवळ 15 मिनीटांत चोरटय़ांनी साधला डाव

प्रतिनिधी / बेळगाव

संकेश्वर येथील एका सराफाच्या कारची काच फोडून चोरटय़ांनी 22 तोळय़ाचे दागिने पळविले आहेत. मंगळवारी रात्री शहापूर येथील बँक ऑफ इंडियाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून चोरटय़ांनी केवळ 15 मिनीटांत काच फोडून दागिने पळविले आहेत.

संकेश्वर येथील संतोष राजशेखर मगदूम (वय 36) या सराफी व्यवसायिकाने या संबंधी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री 9 ते 9.15 यावेळेत ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Related Stories

अनपेक्षित धक्कादायक निवडणूक निकाल

Amit Kulkarni

रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन

Amit Kulkarni

चित्रकला प्रदर्शन-खाद्य महोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

पृथ्वी फौंडेशनकडून सफाई कर्मचाऱयांना रेशन किटचे वाटप

Amit Kulkarni

किरण ठाकुर यांचे 71 व्या वर्षात पदार्पण

Amit Kulkarni

न्यू वैभवनगर येथे सीडीवर्क कामास प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!