Tarun Bharat

सराव शिबिरासाठी 24 जणांचा संघ जाहीर

वृत्त संस्था/ नवी दिल्ली

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने शनिवारी सराव शिबिरासाठी  24 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा केली.

भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाला प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 7 नोव्हेंबरपासून सराव शिबिराला प्रारंभ केला जाणार आहे. हे शिबीर बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये घेतले जाणार आहे. कनिष्ठांच्या विश्वचषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत यजमान आणि विद्यमान विजेता भारताचा ब गटामध्ये समावेश आहे. या गटात कॅनडा, फ्रान्स, पोलंड यांचा सहभाग आहे. अ गटात बेल्जियम, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, चिली, क गटात- हॉलंड, स्पेन, कोरिया, अमेरिका, ड गटात- जर्मनी, अर्जेंटिना, पाक आणि इजिप्त हे संघ आहेत.

 संभाव्य हॉकी संघातील खेळाडू- पवन, प्रशांतकुमार चौहान, साहीलकुमार नायक, संजय, यशदीप सिवाच, श्रद्धानंद तिवारी, अभिषेक लाक्रा, मनजीत, दिनाचंद्र सिंग एम. सुनील जोगो, सिरील लुगुन, विवेक सागर प्रसाद, एम. रविचंद्र सिंग, विष्णुकांत सिंग, गुरूमुख सिंग, अकींत पाल, एस. मारेस्वरन, उत्तम सिंग, मणिंदर सिंग, अरजीत सिंग, सुदीप सी., राहुलकुमार राजबहर, बॉबी सिंग धमी आणि प्रबज्योत सिंग.

Related Stories

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही गणवेश

Patil_p

महिलाशक्तीचा सन्मान, अवयवदानाला प्रोत्साहन

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 388 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी 8 अटकेत

Patil_p

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

prashant_c

मोठय़ा दहशतवादी कटाचा पर्दाफाश

Amit Kulkarni