Tarun Bharat

सर्बियातील बुद्धिबळ स्पर्धेत निहाल सरीन विजेता

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

नुकत्याच झालेल्या सर्बिया खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू निहाल सरीनने मास्टर्स विभागातील विजेतेपद पटकाविले. त्याचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.

निहाल सरीनने यापूर्वी सिल्वर लेक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. केरळच्या 16 वर्षीय निहाल सरीनने सर्बिया बुद्धिबळ स्पर्धेत शेवटच्या फेरीतील आपला डाव अनिर्णित राखला. ही शेवटची लढत सरीन आणि रशियाचा ग्रँडमास्टर फेडोसिव्ह यांच्यात झाली. सदर स्पर्धा 9 फेऱयांची आयोजित केली होती. निहाल सरीनने 9 पैकी 7.5 गुण घेत मास्टर्स विभागातील जेतेपदावर शिक्कामोतर्ब केला. 2018 साली निहाल सरीनने आपल्या वयाच्या 14 व्या वर्षी 2800 पेक्षा अधिक एलो गुण घेत ग्रँड मास्टर किताब मिळविला होता. सर्बियन बुद्धिबळ स्पर्धेत सरीनने 6 डाव जिंकले व 3 डाव बरोबरीत सोडविले.

Related Stories

मुंबई-पंजाब आज आमनेसामने, फलंदाजांची जुगलबंदी अपेक्षित

Omkar B

पीव्ही सिंधू, लोवलिनाचे पदक निश्चित!

Patil_p

महिला बॉक्सिंग : नीतूचा पदार्पणातच विजय

Patil_p

मोहालीत ‘किंग कोहली’वर फोकस!

Amit Kulkarni

वनडेतील कोहली, रोहितची स्थाने कायम

Omkar B

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!