Tarun Bharat

सर्वच क्षेत्रात गोव्याला आत्मनिर्भर बनविण्याची प्रक्रिया सुरू

Advertisements

डिचोली/प्रतिनिधी

आत्मनिर्भर गोवाचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्त कार्य करणार असून मनेरगा  मार्फत सुमारे दीड कोटींची योजना केंद्राने मंजूर केल्याने स्थानिक महिला पुरुष याना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रत्येक हाताला काम देतानाच प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा संकल्प या सरकारचा आहे. बागायती, लघु उद्योग, दूध व भाजीपाला उत्पादन अश्या सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी सर्व ती मदत सरकार पुरवणार, असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

   साळ डिचोली, वडावल येथे तिळारी कालव्याच्या सफाई व गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. ग्रामीण विकास यंत्रणा गोवा सरकार व जलससाधान खाते गोवातर्फे  मनेरगा योजने अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून 120 किलोमीटर तिळारी कालव्याची सफाई स्थानिक महिला पुरुष कामगारांच्या मार्फत केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, मंत्री मायकल लोबो, सभापती राजेश पाटणेकर, मुख्य अभियंता श्रीकांत पाटील, सरपंच घनश्याम राऊत, तसेच इतर सरपंच, पंच, अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

   मुख्यमंत्री सावंत यांनी, यापुढे सरकारची अनेक कामे स्थानिक लोकांना दिली जातील. त्यांना त्यातून रोजगारही मिळेल. मात्र सुशेगात वृत्ती सोडून  आत्मनिर्भर बना सरकार पूर्ण सहकार्य करणार, असे सांगितले. कंत्राटी कामात अनेक गोष्टी असतात. यापुढे कडक धोरण अवलंबून योजनांची कामे लोकांना मिळावीत व प्रत्येक हाताला काम मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

   या प्रकल्पासाठी केंद्राने 1 कोटी 43 लाख तर गोवा सरकारने नाममात्र 7 लाख दिले असून या 120 किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीत शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहे?. त्यासाठी त्यांनी तयारी दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ  सावंत यांनी केले. सर्वच बाबतीत राज्य स्वावलंबी करणे हे प्रत्येक गोमांतकीयाच्या हातात आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

    मंत्री मायकल लोबो यां?नी, ही योजना गोव्यातील लोकांना मोठा रोजगार देणारी असून ग्रामीण विकास योजनेचा केंद्र सरकारशी थेट संपर्क असल्याने या कामाचा पैसे थेट कामगारांच्या खात्यावर जमा होतील. कोविड काळात 1809 स्थानिकांना रोजगार देण्यात आला, असे मायकल लोबो यांनी सांगितले.

केवळ तिलारी कालवाच नाही तर यापुढे इतर कालव्याची कामे ही स्थानिकां?ना दिली जातील व रोजगार हमी योजनेनुसार अनेकांना रोजगार लाभेल असे सांगितले. या पूर्वी कंत्राटी पद्दत करून काम दिले जायचे त्यातून स्थानिक लोकांना काहीच  फायदा मिळत नव्हता. मात्र ही योजना शेकडो लोकांना काम देणार असल्याचे सांगितले.

   सभापती राजेश पाटणेकर यांनी, तिलारी  कालवा सफाईसाठी रोजगार हमी योजनेचा अवलंब करून स्थानिकांना संधी देणे हे सरकारचे मोठे कार्य असून काम दर्जा चांगला राहील. तसेच हाताला काम मिळाल्याने आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागात उंचावेल असे सांगितले.

   श्रीकांत पाटील यांनी या योजनेची माहिती दिली

मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी विधिवत पूजन करून  कामाचा शुभारंभ केला यावेळी खात्याच्या अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

   श्रीकांत पाटील यांनी सांगितले की यापूर्वी कालवा  सफाईसाठी कंत्राट दिले जायचे, मात्र पहिल्यांदाच स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असून पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार. डिचोली पेडणे व

बार्देशमधील प्रत्येकी 200 ते 250 स्थनिकां?ना  रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

हिंदू धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने करावे

Amit Kulkarni

‘हर घर तिरंगा’ महोत्सव यशस्वी करावा

Amit Kulkarni

संसार चालविणे आणि सायकलिंग यांच्यात बरेच साम्य

Amit Kulkarni

खनिज मालावरील अतिरिक्त कर मागे घ्यावा

Amit Kulkarni

सरकारी कार्यालयात मोबाईल वापरणाऱयांना दणका

Amit Kulkarni

दुसरा डोस त्वरित घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!