Tarun Bharat

सर्वसामान्यांना दिलासा; गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी कमी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केशतेल, टूथपेस्ट, साबण यासारख्या गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. या वस्तूंवर पूर्वी 29.3 % कर आकारण्यात येत होता. आता तो 18 टक्के करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

मोदी सरकारने आज करदात्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. 28 टक्के करांच्या खाली केवळ लक्झरी वस्तू व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत 230 वस्तू होत्या, मात्र 200 वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये हलविण्यात आल्या आहेत.

तसेच ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपये आहे त्यांना जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी 20 लाख रुपये होती. याशिवाय सरकारने सिनेमा तिकिटावरील टॅक्सही कमी केली आहे. याआधी 35% ते 110% टॅक्स स्लॅबमध्ये असलेले तिकिटांचे दर आता 12% आणि 18% वर आले आहे. 

Related Stories

देशातील सक्रिय रुग्णसंख्या 35 लाखांसमीप

datta jadhav

देशात 24 तासात 6535 नवे कोरोना रुग्ण, 146 मृत्यू

datta jadhav

भारतात मागील 24 तासात 24,850 नवे कोरोना रुग्ण, 613 मृत्यू

datta jadhav

नवाब मलिकांना कोर्टाकडून दिलासा; किडनी,इतर व्याधींवर उपचार होणार

Archana Banage

अयोध्या दौऱ्यात राजकीय शक्तीप्रदर्शन नाही-संजय राऊत

Archana Banage

संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांचे मोदींनी केले उद्घाटन

datta jadhav