Tarun Bharat

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलत अतिक्रमण करणाऱ्या सहा जणांवर गून्हा दाखल

उचगाव / वार्ताहर

सर्वोच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश डावलून गांधीनगर मुख्य रस्त्याच्या ४७ मीटरच्या आत बांधकाम केल्याप्रकरणी सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशन पंजवानी, मुकेश अहुजा, गोपालदास दर्यानी( तिघे रा. गांधीनगर) व सुहास देवणे, शरद शांतिनाथ चौगुले व अरुण शांतिनाथ चौगुले (सर्व रा.वळीवडे ता. करवीर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तावडे हॉटेल ते रूकडी बंधारा हा गांधीनगरचा मुख्य रस्ता म्हणजे जिल्हा मार्ग क्रमांक २० असून या रस्त्याच्या दुतर्फा सत्तेचाळीस मीटरच्या आत कोणीही नवीन बांधकाम करण्याचे नाही तसेच झालेली बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० मे २०१९ ला दिला आहे. तरीही वरील सहा मिळकतधारकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता बांधकाम केल्याने त्यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या बाबतची फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक अरविंद कांबळे करत आहेत.

Related Stories

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

Abhijeet Khandekar

संजय राऊतांनी ४८ तासात माफी मागावी- किरीट सोमय्या

Archana Banage

कोल्हापूर : खुपिरे ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू नोंद शुन्य; 22 नवे रूग्ण

Archana Banage

Kolhapur Crime:महिला डॉक्टरचा विनयभंग, वकीलावर गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : अन्यथा मनपा इमारतीवरुन उड्या घेवू

Archana Banage