Tarun Bharat

सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ३० टक्के कर्मचारी पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण प्रतिनिधी

देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टातच कोरोनाने आपला विळखा घट्ट केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकुण १० न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हलकी लक्षणे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर संसर्ग वाढलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पलिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत दोन न्यायाधीशांनी कोरोनावर उपचार घेऊन कामाला सुरूवात केली आहे. त्या न्यायाधीशांमध्ये एम जोसेफ आणि पीएस नरसिंहा हे कोरोनातून बरे होऊन कामाला लागले आहेत, अशी माहिती आहे.

Related Stories

जॉन्सन अँड जॉन्सनने मागे घेतला अर्ज

Patil_p

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, ५ कर्मचारी जखमी

Abhijeet Shinde

तालिबान्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; रोहुल्लाह सालेह यांची फरफट करत घातल्या गोळ्या

Abhijeet Shinde

अल्टर, ह्यूटन आणि चार्ल्स राईस यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

datta jadhav

यशस्वी चाचणीनंतरच ‘बूस्टर’

Patil_p

मी धर्म सोडतोय..हिंदू धर्म स्वीकारणार

Patil_p
error: Content is protected !!