Tarun Bharat

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव

44 कर्मचारी पॉझिटिव्ह – न्यायाधीशांचे ‘वर्क फ्रॉम होम’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशात हाहाकार माजवलेला असतानाच आता सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील 44 कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी संपूर्ण न्यायालय इमारत आणि परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. या मोहिमेमुळे कामकाज विलंबाने सुरू झाले. तसेच आता न्यायाधीशांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले असून दैनंदिन सुनावण्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. काही न्यायाधीशांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही वकिलांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे.

Related Stories

इफ्फी : आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडिया का वापरत नाही?

Archana Banage

महाराष्ट्रातील वाढवण येथे मोठे बंदर उभारायला तत्वतः मंजुरी

prashant_c

फेसबुकप्रकरणी लष्कराला दिलासा नाही

datta jadhav

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

पंजाब मुख्यमंत्रिपदी चन्नी शपथबद्ध

Patil_p

दिशा रवीला 1 दिवसाची पोलीस कोठडी

Patil_p