Tarun Bharat

सर्वोत्तम ऍथलिट्स पुरस्कारासाठी महिला, पुरुषांची यादी जाहीर

वृत्तसंस्था/ क्वे अँटोनी

2020 सालातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष ऍथलिट्सची निवड विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे केली जाणार असून मंगळवारी संभाव्य अंतिम यादी घोषित करण्यात आली.

कोरोना महामारी समस्येमुळे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स हालचालीवरही विपरीत परिणाम झाला. 2020 च्या कालावधीत झालेल्या विविध क्रीडा प्रकारामध्ये पाच देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱया पाच महिला ऍथलिट्सची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे पुरुषांच्या विभागातही पाच ऍथलिट्सचा समावेश आहे.

महिलांच्या विभागात इथिओपियाची लिटेसेनबेट गिडे, हॉलंडची सिफान हसन, केनियाची पिरेस, जेपचिरचीर, व्हेनेझुएलाची युलीमर रोजस, जमैकाची इलेन थॉमसन-हेरा यांचा समावेश आहे. इथिओपियाच्या गिडेने महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम केला असून तिने मोनॅकोमध्ये झालेल्या डायमंड लिग ऍथलेटिक्स स्पर्धेत 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत दुसरे स्थान मिळविले. हॉलंडच्या सिफान हसनने एक तासाच्या कालावधीत 18,930 मी. धावण्याचा विश्वविक्रम नोंदविला. तसेच तिने 10000 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा युरोपियन विक्रम केला. केनियाच्या पिरेसने विश्व हाफ मॅरेथॉनचे जेतेपद पटकाविले. तिने त्या क्रीडाप्रकारात दोन वेळा विश्वविक्रम मोडला आहे. व्हेनेझुएलाच्या रोजासने इनडोअर आणि आऊटडोअर स्पर्धेत तिहेरी उडीच्या प्रकारात अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. महिलांच्या इनडोअर स्पर्धेत तिहेरी उडीत तिने 15. 43 मीटरचा विश्वविक्रम केला. जमैकाच्या थॉमसनने महिलांच्या विभागात झालेल्या 100 मी. धावण्याच्या सात शर्यती निर्विवादपणे जिंकल्या. तिने या क्रीडा प्रकारात 10.85 सेकंदाचा विश्वविक्रम केला आहे.

पुरुषांच्या अंतिम यादीमध्ये युगांडाचा जोशुआ चेपतेगेई, अमेरिकेचा रेयान क्राऊजर, स्वीडनचा डुप्लांटिस, जर्मनीचा व्हेटर आणि नॉर्वेचा वॉरहोम यांचा समावेश आहे. 2020 सालातील सर्वोत्तम पुरुष ऍथलिट्ससाठी मतदानाची मुदत 15 नोव्हेंबरलाच संपली आहे. दरम्यान 2020 सालातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला ऍथलिट्सची घोषणा 5 डिसेंबरला केली जाणार आहे.

Related Stories

दुसऱया वनडेत भारत अ संघ पराभूत

Patil_p

भारतीय हॉकी संघ जकार्ताला रवाना

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाला कास्यपदक

Patil_p

भारत-न्यूझीलंड अखेरची टी-20 आज

Patil_p

ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या क्वारंटाईनवेळी टेनिसपटूंना सरावाची मुभा

Patil_p

हैदराबादचा राजस्थानवर तडाखेबंद विजय

Patil_p