Tarun Bharat

सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लिव्हरपूलचे वर्चस्व

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

2020 च्या प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम इंग्लीश फुटबॉलपटूची निवड करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लिव्हरपूल क्लबने आपले वर्चस्व राखले आहे. या यादीमध्ये लिव्हरपूलच्या चार फुटबॉलपटूंचा समावेश आहे.

गेल्यावर्षी या स्पर्धेत लिव्हरपूलच्या व्हर्जिल व्हॅन डिजेकची सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली होती. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेतील विजेता लिव्हरपूलचा संघ आता यावेळी सलग तिसऱयांदा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.  2019-20 च्या प्रिमियर हंगामातील सर्वोत्तम  इंग्लीश फुटबॉलपटूची निवड करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लिव्हरपूलचे  डिजेक, ट्रेंट ऍलेक्सझांडेर-अर्नांल्ड, जॉर्डन हेंडरसन, सॅडिओ मॅनी या चार फुटबॉलपटूंचा समावेश आहे. सहाजणांच्या या यादीमध्ये मँचेस्टर सिटीचे  केव्हीन डी ब्रुने आणि रहिम स्टर्लीग या दोन फुटबॉलपटूंचा सहभाग आहे. व्यवसायिक फुटबॉलपटू संघटनेतर्फे हा पुरस्कार प्रत्येकवर्षी दिला जात असून येत्या मंगळवारी 2020 च्या प्रिमियर लिग फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची घोषणा केली जाणार आहे. 2012 नंतर मँचेस्टर सिटीने चारवेळा प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असले तरी त्याना या कालावधीत एकदाही सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळविता आलेला नाही.  मँचेस्टर सिटीच्या डी. ब्रुनेने चालूवषींच्या  प्रिमियर लिग फुटबॉल हंगामात  13 गोल नोंदविले आहेत.  2018-19 च्या हंगामात सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळविणारा लिव्हरपूलचा मोहम्मद सालाह याने चालूवर्षीच्या प्रिमियर लिग हंगामात  डी. बुनेपेक्षा अधिक गोल नेंदविले असले तरी त्याची लिव्हरपूल क्लबने  सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी शिफारस केलेली नाही.

महिलांच्या विभागात विजेत्या चेल्सी संघातील बेथ इंग्लंड, सोफी इंग्ले, ग्युरो रेटिन आणि जी सो युन या चार फुटबॉलपटूंचा समावेश असून अर्सनेलच्या  मिडेमा आणि लिटल यांचाही या यादीत सहभाग आहे.

Related Stories

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p

माजी फुटबॉलपटू सईद हकीम यांना कोरोनाची लागण

Patil_p

आयर्लंडच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी हॉरिट्झ

Patil_p

रशियाचा मेदवेदेव्ह मानांकनात तिसऱया स्थानी

Patil_p

सुसज्ज ‘मोटेरा’वर आजपासून ऐतिहासिक कसोटी

Patil_p

सायना नेहवालचा बिंग जिआवला पराभवाचा धक्का

Amit Kulkarni
error: Content is protected !!