Tarun Bharat

सर्व्हर डाऊनचा मार्क झुकरबर्गला 52 हजार कोटींचा फटका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री सर्व्हर डाऊनमुळे बंद राहिली. त्यामुळे जगभरातील अब्जावधी वापरकर्ते अस्वस्थ झाले होते. अखेर 6 तासानंतर या तिन्ही ॲप्सची सेवा पूर्ववत झाली. या प्रकाराबद्दल फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी युजर्सची माफीही मागितली. मात्र, सर्व्हर डाऊनचा फेसबुकला मोठा फटका बसला आहे. या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. या घसरणीमुळे  कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती एका दिवसात 7 बिलियन्स डॉलर म्हणजेच 52,190 कोटी रुपयांनी घटली आहे.

सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास युजर्सला सर्व्हर डाऊन झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर युजर्सनी ताबडतोब ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केली. युजर्स जवळजवळ सहा तास या तीन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकले नाहीत. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता फेसबुकने तिन्ही ॲप्सची सेवा पूर्ववत झाल्याचे ट्विट केले आहे. वापरकर्त्यांची गैरसोय झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, सर्व्हर डाऊनमुळे कंपनीच्या रेव्यन्यूमध्ये 80 मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळपास 596 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

Related Stories

बांगलादेशात पुन्हा हिंदू मंदिरांवर हल्ले

Patil_p

थायलंड सरकारकडून 10 लाख फेसबुक अकाऊंट ब्लॉक

datta jadhav

ऍस्टाजेनेकच्या लसीची चाचणी सुरूच राहणार

Patil_p

ब्रिटिश राणी कॅमिलांच्या विमानाला पक्ष्याची धडक

Patil_p

अमेरिकेच्या आण्विक यंत्रणेवर सायबर हल्ला

datta jadhav

‘सागर’ वर साताऱ्याच्या राजांचं मनोमिलन, उदयनराजेंकडून फडणवीसांच्या सत्कार

Abhijeet Khandekar