Tarun Bharat

सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प; परप्रांतियांना फटका

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिका कार्यालयात 10 संगणक उपलब्ध करून परप्रांतियांना अर्ज करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दुसऱयाच दिवशी अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आलेल्या परप्रांतियांनी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे याचा फटका नागरिकांना बसला.

परराज्यातील नागरिकांना व कामगारांना जाण्यासाठी सिंधू सेवा सुविधेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी परप्रांतियांची धावपळ सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्ररप्रांतीय कामगारांना अडचणीची ठरत असल्याने महापालिका कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सायंकाळपर्यंत दहा संगणक उपलब्ध करून अर्ज भरण्यात आले. सोमवारी दिवसभरात महापालिकेच्या माध्यमातून 330 अर्ज भरण्यात आले आहेत. एक अर्ज भरण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी लागत आहे. अर्ज करताना नागरिकांना मोबाईल क्रमांक, आधार ओळख क्रमांक, छायाचित्र द्यावे लागत आहे.  सोमवारी दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. मात्र मंगळवारी सकाळी सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे अर्ज करण्याकरिता आलेल्या परप्रांतियांना कार्यालय आवारातून बाहेर जाण्याची सूचना करण्यात आली. पण सदर नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रांग लावून ठाण मांडले. रखरखत्या उन्हातही ते कार्यालयासमोर बसून होते. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दुसऱयाच दिवशी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ग्रहण लागले. याचा फटका नागरिकांना सोसावा लागला.

याच दरम्यान महापालिका आयुक्त जगदीश के. एच. कार्यालयात दाखल झाले. प्रवेशद्वारावर झालेली गर्दी पाहून आयुक्तांनी याबाबत चौकशी केली. उन्हात बसलेल्या कामगारांची भेट घेऊन सर्व्हर बंद असल्याने अर्ज भरता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कुमार गंधर्व सभागृहात थांबण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली. नागरिकांसाठी पाण्याची सुविधा तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करण्याची सुविधा मनपा अधिकाऱयांना केली.

Related Stories

स्मार्ट सिटीने बसविलेले 20 पैकी 10 सीसीटीव्ही बंद

Amit Kulkarni

जि. पं. अध्यक्षांची जिल्हा कोविड हॉस्पिटलला भेट

Patil_p

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण

Patil_p

बिबटय़ाची भीती कायम

Amit Kulkarni

अन्नभाग्य योजनेतील तांदुळ वितरणात होणार कपात

Patil_p

डॉ. सरनोबत यांच्याकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्याला मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!