Tarun Bharat

सर्व्हिस रोडवरील त्या चेंबरची अखेर दुरुस्ती

तरुण भारत वृत्ताची दखल, जनतेतून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळील सर्व्हिस रोडवर चेंबर खुला ठेवण्यात आला होता. तब्बल 20 फूट खोलीचा हा चेंबर असल्यामुळे धोकादायक होता. त्या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी तसेच नागरिकांतून करण्यात आली होती. याबाबत ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर तातडीने या चेंबरची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

सर्व्हिस रस्त्याला लागून असलेल्या काका कंपाऊंडपासून जवळच हा चेंबर होता. तो चेंबर बऱयाच दिवसांपासून उघडाच होता. त्या सर्व्हिस रस्त्यावरून शेतकरी तसेच इतर नागरिक आणि वाहनचालक ये-जा करत होते. रात्रीच्यावेळी येथे अपघात घडण्याची शक्मयता होती. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष कले होते. वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात आली.

Related Stories

सागर बीएड् कॉलेजचा निकाल 100 टक्के

Patil_p

कर्नाटक : स्मार्टफोन असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ

Abhijeet Khandekar

चॅपेल रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

स्थायी समिती निवडणुकांसाठी कौन्सिल विभाग सज्ज

Amit Kulkarni

शहरात तयार ओल्डमॅन दाखल

Amit Kulkarni

पश्चिम भागातील रस्ते खड्डय़ात हरवल्याने नागरिकांचे हाल

Amit Kulkarni