Tarun Bharat

सर्व ग्रा.पं.वर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा!

जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्राम पंचायत निवडणुकीबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी तालुका म. ए. समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी आपल्या माय मराठीसाठी सर्वांनी एकजुटीने राहून प्रत्येक ग्राम पंचायतीवर भगवा ध्वज फडकवावा, असे आवाहन बैठकीत केले.

तालुक्मयातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणे महत्त्वाचे आहे. गाव पातळीनंतर आपण दिल्लीपर्यंत मजल मारायची आहे. तेव्हा ही पहिली पायरी एकजुटीने राहून निवडणूक लढवून मराठीची ताकद दाखविणे महत्त्वाचे आहे. यासाठी म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली प्रत्येक मराठी भाषिकाने यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, ग्राम पंचायत ही राजकारणाची पहिली पायरी आहे. मराठी माणसाला सध्या वाली नाही. तेव्हा प्रत्येकाने जागरुकतेने या पहिल्या पायरीमध्ये यशस्वी व्हायचे आहे. ज्या कुणाला अर्ज भरून घ्यायचे आहेत, तसेच माहिती हवी असेल तर आम्ही मराठी वकील सर्व ती मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, संतोष मंडलिक, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, ऍड. एम. जी. पाटील, अरुण कानूरकर, कृष्णा हुंदरे, मनोहर संताजी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. एल. आय. पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.

Related Stories

होळी शांततेत साजरी करा

Amit Kulkarni

विश्वातील साऱया शक्ती आपल्यात, त्या शोधाव्या लागतात!

Amit Kulkarni

ओमनी कारची अज्ञात वाहनाला धडक

Patil_p

सतीशच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या

Amit Kulkarni

मल्लिगवाड ग्रामस्थांचा ग्रा. पं. निवडणुकीवर बहिष्कार

Patil_p

माधवबाग कॉलेज रोड क्लिनिकला पुरस्कार

Amit Kulkarni