Tarun Bharat

सर्व जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालये उभारणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिला व नवजात शिशू रुग्णालये उभारणार असल्याची घोषणाही यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. पुढील तीन वर्षात हा खर्च अपेक्षित आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. अकोला आणि बीड येथे स्त्री रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. किडनी स्टोन मोफत उपचार पद्धत शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. तसेच कर्करोग निदान 8 मोबाईल व्हॅन राज्यात सुरू केल्या जाणार आहेत.

दरम्यान, पुण्यात 300 एकरात इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा विधान परिषदेत अर्थराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी केली आहे. सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा असणारी ही देशातील पहिली सिटी असेल. राज्यात विविध ठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Related Stories

भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये

prashant_c

अरुणाचल प्रदेशात वसवलं अख्ख गाव; चीनची कुरापत

Abhijeet Khandekar

…याची चौकशी व्हायला पाहीजे : संजय राऊत यांची मागणी

Tousif Mujawar

हिंगणघाट : जळीतकांड घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा बंद

prashant_c

महाराष्ट्रात थंडीचा कडाका

datta jadhav

भारतात येणार अमेरिकेचे विदेश अन् संरक्षण मंत्री

Omkar B