Tarun Bharat

सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश : अजित पवार

Advertisements

ऑनलाईन टीम मुंबई : 


भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 


ते म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

  • मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये 


दरम्यान , भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील टोपे म्हणाले.

Related Stories

युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता… : रोहित पवार

Rohan_P

”भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र”

Sumit Tambekar

इचलकरंजीत नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन अधिक तीव्र – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 15,229 नवे रुग्ण; 307 मृत्यू

Rohan_P

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेवर राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Abhijeet Shinde

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच मनपाची कारवाई ; नारायण राणेंचे बॅनर हटवले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!