Tarun Bharat

सलगरे येथे गव्याचे दर्शन, ग्रामस्थ भयभीत

Advertisements

सलगरे / वार्ताहर

सलगरे (ता. मिरज) येथे मळाभाग परिसरात गव्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री सलगरे येथील मिरजे कोळेकर वस्तीवरील काही तरूणांना या गव्याचे दर्शन झाले असून, हा गवा बेळंकीकडून सलगरे येथील सांभारे पाझर तलाव, म्हैसाळकर वस्ती, साबळे वस्ती या भागातून जानराववाडीकडे गेल्याचे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. कदाचित हा गवा पुढे कर्नाटक हद्दीतील बमनाळ, विष्णूवाडी, मदभावी, केंपवाड या भागात सुध्दा गेला असण्याची शक्यता व्यक्त होते आहे. सलगरे येथे गव्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर सलगरे येथे येवून या कर्मचाऱ्यांनी गवा पाहिलेल्या तरूणांकडून माहिती घेतली. गावात गवा रेडा आल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

Related Stories

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा, परिसर सील करण्याचे कोर्टाचे आदेश

datta jadhav

कर्नाटक : राज्यात बाधितांच्या संख्येत घट

Archana Banage

…अन् विमानाचा फुटला टायर

Archana Banage

एसटी कामगारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p

रत्नागिरीत बाजारपेठेतील तीन दुकानचालकांवर गुन्हा

Patil_p

सातारा : राज्य शासन सोयाबीन 3880 रुपये हमी भावाने घेणार ; 15 ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु होणार : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage
error: Content is protected !!