Tarun Bharat

सलग आठव्या दिवशी बाधित वाढ 30 च्या खाली

अचूक बातमी “तरुण भारत”ची; सोमवार 22 नोव्हेंबर 2021, स. 11.30

● रविवारी रात्री अहवालात 26 बाधित
● एकूण 1,609 जणांची तपासणी
● लसीकरण तीस लाखांच्या पार
● बाधित वाढ वीस-तीस दरम्यान स्थिर
● जम्बो कोविड हॉस्पिटल केले बंद

सातारा / प्रतिनिधी :

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर बाधित वाढीचा आलेख जिल्ह्यात दिलासादायक घसरलेला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून बाधित वाढ 20 ते 30 दरम्यान स्थिर आहे. यामध्ये सलग आठव्या दिवशी बाधित वाढ 30 च्या राहिली आहे. वाढीचा आलेख कधी वीसनजीक खाली बसून तो पुन्हा कधी तीस नजीक वर जात आहे. यामध्ये सातारा तालुका सोडल्यास सर्व तालुक्यात अनेक वेळा बाधित वाढीचा आलेख शून्यावर राहिलेला आहे.

रविवारी अहवालात 26 बाधित

प्रशासनाकडून सोमवारी सकाळी देण्यात आलेल्या रविवारी रात्रीच्या अहवालात फक्त 26 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 1,609 जणांची तपासणी करण्यात आलेली असून एकूण पॉझिटिव्हिटी दर 1.62 टक्के एवढा राहिलेला आहे. एकूण आजच्या स्थितीत जावली, महाबळेश्वर, खंडाळा, वाई, कोरेगाव, कराड, माण, खटाव हे तालुके पूर्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. अधून-मधून सातारा व कराड तालुक्यात होणारी अल्प वाढ फारशी चिंताजनक नाही त्याचा वेग कमी आहे.

लसीकरण तीस लाखांच्या पार

नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा लसीकरणाने चांगलीच गती घेतली असून जिल्ह्यात एकूण 30 लाख 645 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही मोठी दिलासादायक बाब असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 19 लाख 97 हजार 663 एवढी झाली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली असून ती दहा लाख 2,982 एवढी झालेली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जम्बो कोविड हॉस्पिटल झाले बंद

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात कोरोना बाधितांचे आकडेही एक अंकी संख्या वर आल्याने आता जिल्ह्यातील जगरहाटी कृतीने सुरू झालेले आहे त्यातच कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड हॉस्पिटल देखील आता बंद करण्यात आलेले आहे. कोरोना रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून जिल्ह्यातील इतर खाजगी कोळी हॉस्पिटल ही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

रविवारी जिल्ह्यात
बाधित – 28
मृत्यू – 5
मुक्त – 15
उपचार्थ -284

रविवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने- 22,80,051
बाधित- 2,51,682
मृत्यू – 6,471
मुक्त-2,44,222

Related Stories

वाढ उच्चांकीच, थोडी कमी असल्याचा दिलासा

datta jadhav

सातारा : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे धामणेरची ग्रामस्वच्छता चळवळ देशाच्या नकाशावर

Archana Banage

फिटनेस दाखल्यासाठी पोलिसाची अडवणूक

Patil_p

गृहराज्यमंत्री देसाईंवर पाळत ठेवण्याचा प्रकार

datta jadhav

शहर सुधार समितीच्या आंदोलनाचा फार्स

Patil_p

…तर राजकीय, सामाजिक जीवनातून संन्यास घेईन

datta jadhav