Tarun Bharat

सलग तिसऱया दिवशी हजारावर रूग्णांची नोंद

सातारा/ प्रतिनिधी

दुसऱया लाटेत कोरोनाचे थैमान कमी होण्याऐवजी पुन्हा वाढत चालले आहे. जिल्हय़ात सलग तिसऱया दिवशी हजारावर रूग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांवर गेला आहे. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असून जिल्हाधिकारी या आठवडय़ातील वाढीनुसार निर्बंधांबाबत काय निर्णय घेणार, याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला लॉकडाऊनला होणारा विरोध, वाढती रूग्णसंख्या याचा विचार करून प्रशासनाला निर्बंधांबाबत विचार करावा लागणार आहे. सवलत मिळण्याची शक्यता कमीच आहे. रूग्णवाढीमुळे मृत्यू वाढत चालले आहेत. गेल्या चोवीस तासात 33 मृत्यूंची नोंद झाली असून 879 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

1162 नव्या रूग्णांची नोंद

जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1162 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. सलग तिसऱया दिवशी बाधितांचा आकडा 1 हजारापेक्षा जास्त आला असून यात कराड तालुक्यात सर्वाधिक रूग्णवाढ होत असल्याचे दिसत आहे. कराड तालुक्यात रोज तीनशेवर रूग्ण आढळत असून कोविड रूग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे दिसत आहे.

साताऱयात 205 रूग्णांची नोंद

रोजच्या रूग्णसंख्येत सातारा दुसऱया क्रमांकावर असून येथे 205 रूग्णांची नोंद झाली आहे. साताऱयात 200 च्या आत रूग्णसंख्या आली होती. त्यात पुन्हा वाढ झाली आहे. कोरेगाव तालुका तिसऱया क्रमांकावर असून येथे 114 रूग्ण आढळले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 25 (8833), कराड 350 (30379), खंडाळा 71 (12151), खटाव 77 (20275), कोरेगाव 114 (17553), माण 67 (13555), महाबळेश्वर 14 (4369), पाटण 47 (8948), फलटण 98 (29004), सातारा 205 (41950), वाई 78 (13193) व इतर 16 (1450) असे आजअखेर एकूण 201666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

साताऱयात 8 मृत्यू

गेल्या चोवीस तासात 33 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात सातारा तालुक्यात 8 तर फलटण तालुक्यात 7 मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 1 (183), कराड 3 (906), खंडाळा 1 (154), खटाव 7 (475), कोरेगाव 2 (383), माण 1 (284), महाबळेश्वर 0 (84), पाटण 2 (301), फलटण 7 (477), सातारा 8 (1246), वाई 0 (304) व इतर 1 (71), असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 4868 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

879 जणांना डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 879 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

लस खासगी रूग्णालयात उपलब्ध; सरकारी बंद

तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांत लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. पहिल्या डोसची लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. तर दुसरा डोसही पुरेसा उपलब्ध होत नसल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसत आहे. खासगी रूग्णालयांमध्ये लस उपलब्ध झाली असून सरकारी लसीकरण थंडावले आहे.

निर्बंधांचे काय होणार

दर शुक्रवारी जिल्हय़ातील बेड आणि रूग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्बंध कमी-जास्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा तिसऱया स्टेजमध्ये आहे. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार, याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे.

Related Stories

जिल्ह्यात 33 नवे बाधित

datta jadhav

संभाव्य महापुरासाठी कुरूंदवाड पालिका प्रशासन सज्ज

Archana Banage

१ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Archana Banage

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Archana Banage

आरोग्य विभागाकडील १७ हजार रिक्त जागा भरणार – आरोग्य मंत्री टोपे

Archana Banage