Tarun Bharat

सलग दुसऱया दिवशी 18 हजारांवर रुग्ण

देशात दिवसभरात 100 बळी – सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सलग दुसऱया दिवशी रविवारी देशात 18 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. नव्या वाढीव रुग्णांमुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा 1 कोटी 12 लाख 10 हजार 799 इतका झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 100 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 57 हजार 756 बळी गेले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसात सातत्याने वाढत चाललेल्या रुग्णांमुळे भारतात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अखेरच्या 24 तासात देशात 18 हजार 711 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारच्या तुलनेत हा आकडा चारशेने वाढला आहे.  तसेच आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 68 हजार 520 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 84 हजार 523 इतकी झाली आहे. गेल्या पंधरवडय़ात नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसात चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. ‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 22 कोटी 14 लाख 30 हजार 507 जणांची चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी एका दिवसात 7 लाख 37 हजार 830 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

Related Stories

सातवा वेतन आयोग ऑक्टोबरमध्ये स्थापणार

Patil_p

शेतकऱयांच्या मालमत्ता जप्तीवर आणणार निर्बंध

Patil_p

अनुच्छेद 370 चा निर्णय ‘ऐतिहासिक’

Patil_p

कोरोनाचा औषधांच्या किमतींवरही पडतोय प्रभाव

Patil_p

उर्वरित टी-20 मालिकेसाठी बुमराहऐवजी सिराजचा समावेश

Patil_p

चीनच्या ताब्यातील 10 जवानांची सुटका

datta jadhav