Tarun Bharat

सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढीचा आलेख खाली

अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 24 ऑगस्ट 2021, स. 11.15

● सोमवारी रात्री अहवालात 529 बाधित ● एकूण 13,970 जणांची तपासणी  ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 3.8 टक्के ● काही नागरिकांकडून बेशिस्तपणा ● कारवाईपेक्षा स्वयंशिस्तच वाचवेल

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात कोरोना संसर्गातील बाधित वाढीच्या तीन अंकी संख्येच्या वाढीचा आलेख कायम असला तरी रविवारच्या अहवालात वाढीचा आलेख खूप दिवसांनी 500 च्या खाली आला. हा दिलासा असतानाच सोमवारी रात्रीच्या अहवालात देखील वाढीचा आलेख खाली घसरल्याने तो थोडा पाचशेचा वरती राहिला असला तरी 600 च्या आत असल्याचा दिलासा असून,  529 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढीचा आलेख खाली घसरल्याचा मोठा दिलासा जिल्हय़ाला लाभला आहे.  

सोमवारी अहवालात 529 बाधित

सोमवारी रात्री प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार एकूण 13,970 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ 529 जणांचा अहवाल बाधित आला आहे. प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे आरटीपीसीआर पॉझिटिव्हीटी दर व रॅपिड अँटीजनचा पॉझिटीव्हिटी दर किती याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर खाली घसरत असल्याचाही मोठा दिलासा अजून पॉझिटिव्हिटी दर 3.8 टक्केे एवढा खाली घसरलेला आहे. 

काही नागरिकांकडून बेशिस्तपणा

ऑगस्टच्या अंतिम चरणात बाधीत वाढ मंदावत असल्याचा दिलासा लाभत असून गेल्या दोन दिवसापासून बाधित वाढ पाचशेच्या आसपास रेंगाळत असली तरी सलग दोन दिवस ती खाली राहिली आहे. मात्र अद्यापि शहरी व ग्रामीण भागातील काही लोक नियम पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अद्याप काही महिने तरी कोरोनाला हरवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर चा वापर, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता तिसऱ्या लाटे पासून वाचण्यासाठी अगोदरच काळजी घेतली तर तिसऱ्या लाटेचा फटका बसणार नाही.

कारवाईपेक्षा स्वयंशिस्तच वाचवेल

जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून बाधित नागरिकावर उपचार करणे, त्यांना दिलासा देणे या गोष्टी सुरूच आहेत, तद्वतच तपासणी वाढवण्यात आल्यामुळे तोही भार आरोग्य विभागावर असतानाच दुसरीकडे लसीकरण ही सुरू आहे. या सर्व पातळ्यांवर प्रशासनाची लढाई सुरू असून कोरोना पासून वाचण्यासाठी काय करायचे याबाबत आता नवीन काही सांगण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करत वाटचाल केल्यास संसर्ग वाडीला रोख बसू शकतो. त्यामुळे नागरिकांना स्वयंशिस्त वाचवेल असा संदेश परिस्थिती देत आहे.

काही बनावट लॅबचा सुळसुळाट 

जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग ला सध्या खूप महत्त्व असल्याने काही लॅबला परवानगी नसताना देखील कोरोना टेस्टिंग त्यांच्याकडून केले जात आहे. मात्र यामध्ये नियमांचे पालन होत नसल्याने अगदी रिपोर्ट बदलण्यापासून ते निगेटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी जास्ती पैसे घेण्याचे प्रकारही सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लॅब वर कारवाई करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. लवकरच अशा कोणत्या लॅब आहेत याची माहिती समोर येईल.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 16,84,430  एकूण बाधित 2,35,167  एकूण कोरोनामुक्त 2,22,742  मृत्यू 5827  उपचारार्थ रुग्ण 9,640  

सोमवारी जिल्हय़ात बाधित 480 मुक्त 1,578 मृत्यू 12  

Related Stories

सातारा : घोलपवाडीचा देवऋषी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

datta jadhav

कासट मार्केटमधील अतिक्रमीत टप्रयाना चोरटय़ाचे ग्रहण

Patil_p

जिल्हा पोलीस दलाकडून कारवाईचा धडाका सुरू

Patil_p

35 मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Patil_p

मृत्यूनंतरही ओठावर ज्याचे नाव राहते तो किर्तीवंत

Patil_p

सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा पाच लाखाचा टप्पा पार

datta jadhav