Tarun Bharat

सलग दुसऱ्या दिवशी हिसडा टोळीचा दणका; 90 हजाराचे पळवले मंगळसूत्र

सांगली प्रतिनिधी

शहरात हिसडा टोळीने सलग दुसऱ्या दिवशी हिसडा मारून तीन तोळ्याचे ९० हजार रूपये किमंतीचे मंगळसुत्र पळवून नेले आहे. ही घटना खरे क्लब ते धामणी रस्त्यावर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली आहे. याबाबत विद्या दत्तात्रय पै रा. माळी टॉकिज, गुलमोहोर कॉलनी, विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी सौ. विद्या पै या खरे क्लब हाऊस येथे एका लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या नातेवाईक महिलेसोबत दुचाकीवरून गेल्या होत्या. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्या दोघी खरे क्लब हाऊस येथून धामणी रस्त्यावरून दुचाकीवरून परत असताना अचानक पाठीमागून एक मोटारसायकल स्वार आला आणि त्यांने सौ. पै यांना काही समजण्याच्या आधीच त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याच्या मंगळसुत्राला हिसडा मारला. आणि हे मंगळसुत्र पळवून नेले. हा हिसडा मारल्यानंतर पै यांनी तात्काळ दुचाकी थांबविली आणि आरडाओरड केली पण या हिसडा मारणाऱ्या दुचाकीस्वाराने वेगाने पळ काढला. दरम्यान या परिसरातील नागरिकांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मिळून आला नाही. तात्काळ पै यांनी याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यास दिली.

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,441 नवे कोरोना रुग्ण; 258 मृत्यू

Tousif Mujawar

होय! वानखेडेंनी माझ्याकडूनही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या

datta jadhav

उद्धव ठाकरेंबाबत दीपक केसरकरांचा कोल्हापुरात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी साक्षीदार…

Archana Banage

सांगली : नाना पटोले यांच्याकडून वसंतदादा पाटील यांना अभिवादन

Archana Banage

खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब

Archana Banage

दिल्लीत आता नायब राज्यपालांचे सरकार

datta jadhav