Tarun Bharat

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरातून जनतेला दिलासा दिला होता. सरकारने थेट एक्साइज ड्यूटीमध्ये पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कपात केले होते. मात्र अनेक दिवसानंतर मंगळवारी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. आज पुन्हा देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच काही दिवसानंतर महागाई सुरू झाली आहे. आज पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लीटर ८० पैशांनी वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ९७.०१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ८८.२७ रुपये प्रति लीटर झाली आहे.

सलग दोन दिवसांच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर १११.६७ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ९५.८५ रुपये प्रति लीटर झाले आहे. देशातील आणखीन एका महानगर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.४२ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचे दर प्रति लीटर १०२.९१ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर ९२.९५ रुपये झाले आहे.

दरम्यान, मंगळवारी पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरच्या दारातही 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता 14 किलोचा गॅस सिलिंडर 949.50 रुपयांवर पोहचला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडर महागला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

Related Stories

संतापजनक: कोल्हापुरात पोलिसांनी मंत्र्यासाठी वाहनधारकावर उगारला हात

Archana Banage

झायडस कॅडिलाला 1 कोटी डोसची ऑर्डर

Patil_p

‘सितरंग’ बांग्लादेशकडे वळणार

datta jadhav

राजधानी दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के 

Tousif Mujawar

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; केली ‘ही’ विनंती

Tousif Mujawar

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा कपात

Patil_p
error: Content is protected !!