Tarun Bharat

सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम

वाई तालुक्यातील देगाव आणि पाटण तालुक्यातील मानेवाडीचा सन्मान

प्रतिनिधी / सातारा

पंडित दिनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 साठी सातारा जिल्हा परिषदेची निवड झाली आहे. दि. 31 मार्च रोजी केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आले. तसेच जिह्यातील पाटण तालुक्यातील मानेवाडी, वाई तालुक्यात देगाव या गावांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे.

पंडिद दिनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार या स्पर्धेत ऑनलाईन माहिती भरण्यात आली होती. त्याची महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय क्षेत्रीय तपासणी समिती यांच्यामार्फत दि. 27 जानेवारी 2021 तपासणी करण्यात आली होती. प्रस्तावासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे,व सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी महेंद्र देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन दीक्षित, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुधारक कांबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, अर्थ, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे, पशुसंवर्धन, पाणी व स्वच्छता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, बांधकाम, महिला व बाल कल्याण व एकात्मिक बाल विकास योजना या विभागातील कर्मचाऱयांनी नियोजन केले.

त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या यशामध्ये सलग दुसऱयांदा मानाचा तुरा रोवला. तसेच ग्रामपंचायतबाबतीत गट विकास अधिकारी यांनी व ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले. या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती सोनाली पोळ, यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मान्याचीवाडी व देगाव ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले.

या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. तसेच मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार देखील प्राप्त झाला असून यासाठी 10 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. केंद्र शासनाने दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी 100 गुणांची प्रश्नावली निश्चित केली आहे. प्रश्नावलीतील स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिंक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई गव्हर्नन्स इत्यादी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे ग्रामपंचायतीमार्फत स्वयंमुल्यांकन करुन प्रश्नावली ऑनलाईन भराल्यानंतर पंचायत समितीकडे, पंचायत समितीने सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचे नामाकंन पाठविण्यात येते. त्यानुसार शासनाने विभागीय आयुक्त स्तरावरुन नेमण्यात आलेल्या पालघर, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पथकामार्फत जानेवारी 2021मध्ये तपासणी केली होती. या पथकाने केलेल्या मुल्यांकनानुसार राज्य शासनाने केंद्र शासनास केलेल्या शिफारशीमधून मान्याचीवाडी व देगाव या ग्रामपंचायतीची देशपातळीवरुन निवड करण्यात आली. मान्याचीवाडी व देगाव ग्रामपंचायतींनी मिळवलेल्या यशामुळे सातारा जिह्याचा नावलौकिक राज्यात व देशपातळीवर झाला आहे.

वाई तालुक्याने सलग दुसऱया वर्षी मिळवला सन्मान

वाई तालुक्यातील गतवर्षी ओझर्डे या गावाने यामध्ये पारितोषिक मिळवले होते. यावर्षी वाई तालुक्यातील देगाव या गावाने यश मिळवले आहे. त्यामुळे वाई तालुक्याचे गटविकास अधिकारी उदय कुसूरकर यांच्यासह त्या गावाच्या सरपंचांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Related Stories

शहरात 18 कोटींची रस्त्यांची कामे मार्गी लावणार

Patil_p

‘सातारा स्वाभिमान हाच साम्राज्याचा अभिमान’

Patil_p

पाच कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

datta jadhav

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाची प्रवाशांनाच झळ

Patil_p

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी १६ कोटी मंजूर

Archana Banage

ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास

Patil_p