Tarun Bharat

सलग 3 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी लॉरा पहिली ब्रिटिश महिला

महिला मॅडिसन इव्हेंटमध्ये अव्वल यश, केनी लॉराच्या खात्यावर आता एकूण 5 ऑलिम्पिक सुवर्णपदके

लॉरा केन्नी ही 3 लागोपाठ ऑलिम्पिकमध्ये सलग 3 सुवर्ण जिंकणारी पहिली ब्रिटीश महिला ऍथलिट ठरली. कॅटी आर्चिबाल्डसमवेत तिने मॅडिसन इव्हेंटमध्ये हा पराक्रम गाजवला. इझू व्हेलोड्रोम येथे 30 किलोमीटर्स अंतराच्या या इव्हेंटची फायनल संपन्न झाली. सध्या तिच्या खात्यावर ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्ण व 1 रौप्य अशी 6 पदके आहेत.

केन्नी व आर्चिबाल्ड यांनी सर्वाधिक 78 गुण संपादन करत मॅडिसन इव्हेंटमधील आपला मास्टरक्लास दाखवून दिला. डेन्मार्कला रौप्य तर रशियन ऑलिम्पिक कमिटीला कांस्य पदक जिंकता आले.

सायंकाळच्या सत्रात जॅक कार्लिनने पुरुषांच्या स्प्रिन्टमध्ये कांस्य जिंकत गेट ब्रिटनला आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. दरम्यान, लॉरा केन्नी हिने 6 ऑलिम्पिक पदके जिंकत इक्वेस्ट्रियन शार्लोट दुजार्दिनच्या विक्रमाशी बरोबरी केली.

मॅडिसन इव्हेंटमधील सुवर्णपदकामुळे तिने आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये आणखी मोलाची भर टाकली. यापूर्वी, लंडन 2012 व रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये देखील लॉराने असेच यश संपादन केले होते. टोकियोमध्ये या आठवडय़ात केन्नीने महिला परस्यूट टीमसह रौप्य देखील जिंकले आहे. 5 सुवर्णपदकामुळे ऑलिम्पिक इतिहासात ती सर्वात यशस्वी महिला ट्रक सायकलिस्ट देखील ठरली.

ब्रिटनतर्फे तीन ऑलिम्पिकमध्ये सलग सुवर्ण जिंकणारी पहिली महिला ब्रिटीश ऑलिम्पियन ठरल्याबद्दल काय वाटते, या प्रश्नावर ती म्हणाली, ‘हे निव्वळ आश्चर्यकारक आहे. रेस जिंकावी, असे आज ज्या तडफेने वाटले, तितके कधीच वाटले नव्हते. याचमुळे भीती होती, दडपणही होते. मात्र, मी यापूर्वी जिंकले होते आणि आताही जिंकले’.

Related Stories

पश्चिम विभाग संघाची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p

मार्कस ट्रेस्कोथिक इंग्लंडचे नवे फलंदाजी प्रशिक्षक

Patil_p

श्रीलंका, दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

व्हिएतनामची भारतावर एकतर्फी मात

Patil_p

भारताचा शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय

Patil_p

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेश, आयर्लंड संघ पात्र

Patil_p