Tarun Bharat

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात होता. हा कट रचण्यात हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई गॅंगने पुढाकार घेतला होता. मात्र, सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करण्यात आली आहे. राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असे या गॅंगस्टरचे असून तो या टोळीचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. 


काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान  बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. 


राहुल हा कुविख्यात गुंड असून त्याने आतापर्यंत चार हत्या केल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर 2019 मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती. तसेच 20 जून 2020 मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती. त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही 24 जून 2020 मध्ये एकाची हत्या केली होती. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


राहुलने मुंबईत वांद्रे येथे जानेवारीमध्ये सलमाची रेकी केली होती. त्यासाठी त्याने मुंबईत थांबून सलमान किती वाजता घरात येतो, बाहेर जातो यावर लक्ष ठेवले होते. 15 ऑगस्ट रोजी उत्तर खंडातील पौडी गढवाल मधून त्याला अटक केली होती. तसेच चार दिवस त्याला रिमांडमध्ये पाठवण्यात आले होते. मंगळवारी त्याचा रिमांड काल संपल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची निमका तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 

Related Stories

अमित शाहांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी अँम्ब्युलन्सला रोखलं; व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

महिला सावकाराच्या त्रासातून युवकाची पोलीस ठाण्याच्या टेरेसवर आत्महत्या

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

datta jadhav

सोनाली कुलकर्णीचे भावासोबत ‘या’ क्षेत्रात पदार्पण

Archana Banage

उमळवाड शर्यतीत हरिपूरच्या निशिकांत बोंद्रे यांची गाडी प्रथम

Abhijeet Khandekar

दिल्लीत चोवीस तासांत 384 कोरोना रुग्ण

Tousif Mujawar
error: Content is protected !!