दिग्गज अभिनेत्री करणार दिग्दर्शन
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित त्रिभंग चित्रपटानंतर काजोलने पुढील चित्रपट सलाम वेंकीची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम अभिनेत्री रेवती करत आहेत. या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. काजोलने चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत शूटिंग सुरू झाल्याचे सांगितले आहे.


काजोलने इन्स्टाग्रामवर रेवती यांच्यासोबतची छायाचित्रे शेअर केली ओहत. आज आम्ही अशा कहाणीचा प्रवास सुरू करत आहोत, जो सांगण्याची अत्यंत गरज होती. एक असा मार्ग, ज्यावर चालणे आवश्यक होते आणि एक असे जीवन ,ज्याचा जल्लोष केला जावा. सलाम वेंकीची ही अविश्वसनीय खरी कहाणी मांडणार आहोत असे काजोलने म्हटले आहे.
सलाम वेंकीची निर्मिती सूरज सिंह, श्रद्धा अग्रवार आणि वर्षा कुकरेजा करत आहेत. चित्रपटाची कहाणी सत्य घटना आणि व्यक्तिरेखांनी प्रेरित आहे. सलाम वेंकीमध्ये काजोल एका आईची भूमिका साकारत आहे. त्रिभंग या चित्रपटात काजोल यापूर्वी दिसून आली होती. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली होती. त्यापूर्वी ती तानाजी-द अनसंग वॉरियर या चित्रपटात अजयसोबत झळकली होती.
तर रेवती या तमिळ, तेलगू, आणि मल्याळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय काम केले आहे. 1991 मध्ये सलमान खानसोबत त्यांनी लव्ह चित्रपट केला होता, हा चित्रपट अद्याप प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मागील काही वर्षांमध्ये रेवती यांनी 2 स्टेट्समध्ये काम केले होते. तर दिग्दर्शिका म्हणून रेवती यांचा पहिला चित्रपट ‘मित्र, माय प्रेंड’ होता, जो 2002 साली प्रदर्शित झाला होता.