Tarun Bharat

सवलतीच्या दरात रशियाकडून तेल खरेदी करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली : प्रतिनिधी

युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर अनेक पाश्चात्य देशांनी कठोर निर्बंध लादली असतानाच भारत रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात घेण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिका-यांनी सांगितली आहे. रुपया-रूबल व्यवहाराद्वारे पेमेंटसह खरेदी करण्यासाठी रशियन ऑफर भारत सरकार स्विकारण्याची शक्यता असल्याची कळते.

आपल्या तेलाच्या गरजेपैकी 80 टक्के तेल आयात करणाऱ्या भारताला साधारणपणे 2 टक्के ते 3 टक्के पुरवठा रशियाकडून होतो. परंतु या वर्षी आतापर्यंत तेलाच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत, त्यामुळे तेलावर वाढणारे बिल कमी करण्यास सरकारला मदत होत असल्यास रशियाकडून तेल खरेदी वाढविण्याचा विचार करत आहे.

“रशिया तेल आणि इतर वस्तू मोठ्या सवलतीत देत असुन ते घेण्यास आम्हाला आनंद होईल. यामुळे आमच्याकडे टँकर, विमा संरक्षण आणि तेल मिश्रण यासारख्या काही समस्या सोडवल्या जाऊ शकतात तसेच आमच्याकडे तसे आल्यावर आम्हीही ही सवलत घेऊ,” असे एका भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

बुलेट ट्रेन प्रकल्प 2026 पर्यंत होणार

Patil_p

संभाजीराजेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची सदिच्छा भेट

Archana Banage

पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी

Patil_p

12 सप्टेंबरपासून 80 रेल्वे धावणार

Patil_p

नेल्सन मंडेला यांच्या कन्या झिंदझी यांचे निधन

datta jadhav