प्रतिनिधी / कोल्हापूर
रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती आणि श्री अंबाबाई भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी पहाटे रंकाळा परिप्रम उपक्रम राबवण्यात आला,. उपक्रमाचे 5 वे वर्ष असल्याने नववर्षांच्या पुर्वसंध्येला रंकाळा तलावाला 5 पेऱया मारण्यात आल्या. याद्वारे सव्वातीन तासांत 22 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करण्यात आली.
रंकाळा संवर्धन संरक्षण समितीच्यावतीने आयोजित पाचव्या रंकाळा परिक्रमेला गुरूवारी पहाटे विकी महाडीक आणि वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनील सोलापुरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी धोंडीराम चोपडे, अजित मोरे, नाना गवळी, परशुराम नांदवडेकर, उदय गायकवाड, माहेश्वरी सरनोबत, बजरंग चव्हाण यांनी रंकाळा परिक्रमेच्या 5 फेऱया पुर्ण केल्या. या परिक्रमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रंकाळा परिक्रमा पूर्ण केलेल्यांना सांगता प्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, अशोक देसाई यांच्या हस्ते सहभागी वॉकर्सना प्रमाणपत्रे देण्यात आली. उपक्रमात मावळा ग्रुप, आनंदी जीवन ग्रुप, प्रदक्षिणा ग्रुप, कोल्हापूर मोटर्स ऍथलेटिक्स ग्रुप, व राज्यस्तरावरील वॉकर्स सहभागी झाले होते. यावेळी अजय कोराणे, उमेश पवार, दिलीप देसाई, सुधर्म वाझे, सुभाष हराळे, प्रा. एस. पी. चौगले, संजय मांगलेकर, अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी स्वागत केले. रंकाळा समितीचे राजेंद्र पाटील यांनी सुत्रसंचालन केले. विकास जाधव यांनी आभार मानले.