Tarun Bharat

सव्वा वर्षानंतरही ऍस्ट्रोटर्फ मैदानाची निर्मिती अंधातरीतच

कोल्हापूर / संग्राम काटकर

गांधी मैदान, जनता बझारनजिकच्या जुन्या कबड्डी मैदानावर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध खेळांसाठी अत्याधुनिक ऍस्ट्रोटर्फ मैदानाची निर्मिती केली जाणार आहे. 13 जुलै 2019 ला मैदान निर्मिती उद्घाटनाचा नारळही फुटला होता. कोणी साध्या-सुध्याने नव्हे तर माजी महापौर माधवी गवंडी व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीच हा नारळा फोडला होता. मात्र नारळ फुटल्याच्या दिवसापासून आजतागायत म्हणजे 15 महिने उलटले तरीही ऍस्ट्रोटर्फ मैदानाच्या निर्मितीला सुरुवात झालेली नाही. शिवाय ऍस्ट्रोटर्फ मैदानासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या 83 लाख रुपयांच्या निधीचे नेमके काय झाले हेही अद्यापही कळलेले नाही.
जनता बझारनजिकच्या मोठÎा जागेत कबड्डी मैदान तयार करण्यात आले होते.

या मैदानात ताराराणी स्पोर्टस्चे संघ सराव करत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून कबड्डीचा सरावच बंद राहिल्याने कबड्डी मैदानाची जागा तशीच पडून राहिली होती. ही जागा वापरात रहावी, गांधी मैदान परिसरातील खेळाडूंना येथे विविध खेळ खेळता यावे, यासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जागेवर ऍस्ट्रोटर्फ मैदान निर्मितीसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी लागणारा निधी मिळविण्यास क्षीरसागर यांनी स्वतःहून जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा ऍस्ट्रोटर्फ मैदानाच्या निर्मितीसाठी मंजूरी दिली होती. शिवाय तब्बल 83 लाखांचा निधीही मंजूर केला होता.

मैदान लवकर तयार होऊन ते खेळाडूंसाठी खुले करण्याच्या भावनेने 13 जुलै 2019 ला मैदान निर्मितीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मैदानासाठी मंजूर केलेला निधी मैदानाच्या निर्मितीसाठी संबंधीत यंत्रणेकडे वर्ग केला जाईल, असेही सांगण्यात आले. पण निधी वर्ग झाला की नाही, मैदान निर्मितीचे काम नेमके कुठे थांबले हे आजपर्यंत गुलदस्त्यांतच राहिले आहे. 15 महिने उलटत आले तरीही मैदान निर्मितीसाठी काहीच हालचाली न झाल्याने मैदानाच्या जागेवर 3 ते 4 फुट उंचीच्या वनस्पती उगवून आल्या आहेत. बेफिकिरपणे कचरा ही येथेच टाकला जात आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांही मोठÎा प्रमाणात पहायला मिळत आहेत. गांधी मैदानात सायंकाळी 7 नंतर बसणारे तळीराम तर मद्यप्राशनानंतर बिनधास्तपणे आपल्याकडील बाटल्या व ग्लास मैदानातच टाकत आहेत. वेळेवर कचरा उठाव केला जात नसल्याने भागात दुर्गंधीही सुटत असते. जोपर्यंत ऍस्ट्रोटर्फ मैदानाची निर्मिती होणार नाही, तोपर्यंत जागेचा होणारा दुरुपयोग थांबणार नाही, हे मात्र निश्चित आहे.

आठ दिवसात मैदान निर्मितीला सुरुवात

ऍस्ट्रोटर्फ मैदानाच्या निर्मितीसाठी पुण्यातील एका संस्थेकडून डिझाईन तयार करुन घेतले आहे. येत्या आठ दिवसात मैदानाच्या जागेची पाहणी केली जाईल. तसेच डिझाईननुसार ऍस्टोट्रर्फ मैदान तयार करण्याला सुरुवात केली जाईल. पुढील 3 ते 4 महिन्यात हे मैदानाचे सर्व बाजूंनी सुसज्ज करुन ते लोकार्पण होईल.
राजेश क्षीरसागर (कार्यकारी अध्यक्ष ः राज्य नियोजन मंडळ)

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात ७७९ जण कोरोनाबाधित, १८ जणांचा मृत्यू

Archana Banage

अथणी शुगर्सचे अंतिम बिल २८०० रुपये प्रमाणे

Archana Banage

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 31922 क्युसेक विसर्ग,102 बंधारे पाण्याखाली

Archana Banage

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप

Archana Banage

थेट पाईपलाईनला वाकडे वळण : राजकीय डावपेचांचा खो..!

Abhijeet Khandekar

निष्क्रिय मंत्र्यांमुळे कोल्हापूरच्या कोरोना मृत्युदरात वाढ

Archana Banage