Tarun Bharat

सहआयुक्त आकाश चौगुले यांचे दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी / बेळगाव

मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 3 एप्रिल रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी पुणे येथील जीएसटीचे सहआयुक्त आकाश शंकर चौगुले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत लॉकडाऊनमधील शिक्षण व करिअर या संदर्भात सुसंवाद साधला.

त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटवून दिले. दैनंदिनी लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

‘लेखक कसे घडतात’? यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. ‘यश मिळविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात’ ही गोष्ट उदाहरणांच्या मदतीने समजावून सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिक्षिका सविता पवार यांनी केले. शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी आभार मानले. यावेळी गौरी चौगुले, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

दोन महिन्यांनंतर दिवसभर शहर गजबजले

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथील जुना पूल पुन्हा पाण्याखाली

Patil_p

पहाटे पाऊस, दिवसभर उघडीप

Amit Kulkarni

कर्नाटक : गोव्यातील कन्नड भवनासाठी 10 कोटी अनुदान

Abhijeet Khandekar

यमनापूर येथील ती जागा राखीव ठेवा

Amit Kulkarni

ड्रेनेजवाहिन्या तुंबल्याने विहिरींचे पाणी दूषित

Amit Kulkarni