Tarun Bharat

सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल…

ऑनलाईन टीम / सातारा :

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील भाजपच्या साथीने 8 मतांनी विजयी झाले. पाटील यांनी दिवंगत माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पूत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांना पराभूत केले. त्यामुळे पाटील यांची आता जिल्हा बँकेत एन्ट्री झाली आहे.

या निवडणुकीत 140 मतदान होते. त्यापैकी 74 मते घेऊन बाळासाहेब पाटील विजयी झाले असून, त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8 मतांनी पराभव केला. सहकारमंत्री पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे भाजपच्या भोसले गटाला जवळ करून शिष्टाईतून लढवलेल्या निवडणुकीत त्यांनी उंडाळकरांना पराभूत केले. उंडाळकर हे स्वबळावर निवडणूक लढवत होते.

Related Stories

पालिकेच्या तीन गाडय़ा भंगारात

Patil_p

तब्बल दिड वर्षाने दुकाने 10 पर्यंत खुली

Patil_p

दिव्यांग संघटनेचा आत्मदहनाचा इशारा

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 196 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यू

Archana Banage

सातारा : संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी

Archana Banage

सातारा जिल्ह्यात सकाळपासून २१ कोरोनाबाधित

Archana Banage