Tarun Bharat

सहकारी बँका, कारखाने या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी द्या : रोहित पवार

Advertisements

ऑनलाइन टीम / मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एक प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.  

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्यात यावा. जेणे करुन ग्रामीण भागात ही चांगली आरोग्य सेवा देण्यास मदत होईल, अशी कल्पना मांडली आहे. 

तसेच सध्या दुधाची भीषण समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाची भुकटी तयार करून ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत, रेशनवर स्वस्त दरात देता येईल का याबाबत विचार करावा अशी ही विनंती केली आहे. 

त्याच बरोबर विवध योजनांचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे गावपातळीवरील शाखांमध्ये सॅनिटायझर ठेवावीत अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली आहे.  

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना मेंशन केले आहे. 

Related Stories

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासात 2250 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

उत्तराखंड : प्रदेशातील बेरोजगारांना दिलासा

Rohan_P

लखीमपूर खेली प्रकरणावरून शरद पवारांनी साधला केंद्रावर निशाणा

Abhijeet Shinde

अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात ठोकला 100 कोटींचा दावा

datta jadhav

विधानपरिषदेबाबत ‘मनसे’चा सस्पेन्स; मतदानाबाबत काय म्हणाले आमदार

Abhijeet Khandekar

…त्यामुळे गीते सारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेत नाही: संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!