Tarun Bharat

सहकार मोडण्याचे सरकारचे धोरण – प्रा. आनंद मेणसे

कोल्हापूर / प्रतिनिधी

स्वातंत्र्य चळवळ आणि सहकार चळवळ याचा एक मेकांशी संबध आहे. महात्मा गांधी यांनी चळवळीच्या काम बरोबर विधायक काम करा असे आदेश दिले होते. विधायक म्हणजेच सहकार होय. पण आताचे सरकारला याचा विसर पडला आहे. तो मोडीत काढला जात आहे. असा आरोप प्रा. आनंद मेणसे यांनी केला. अखिल भारतीय किसन संगर्षं समनव्य समितीच्या वतीने आयोजित सहकार वाचवा परिषदेत बोलत होते.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीचा मालक नोकर झाला आहे. आत्ताचे सत्ताधारी म्हणजे त्या वेळचे जनसंघ होय. चुकीच्या पद्धतीने शेतकरी कायदे करून समाज व्यवस्था मोडण्याचा घाट सत्ताधारी लोकांचा आहे.

सहकार शेती मोडून धनिकांच्या घश्यात घालण्याचा डाव सरकारचा आहे. कामगार शेती, सहकार चळवळ टिकवण्यासाठी तरुणांना पुढे आले पाहिजे. सहकार संकल्पना टिकवण्यासाठी तळापर्यंत काम पोहचले पाहिजे. नॅशनल बँका यासाठी योगदान देत नाहीत. केंद सरकार कार्पोरेट खरे आहे. असा भास करत आहेत, असा आरोप केला.

यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संपत बापू पाटील, बाबुराव कदम, नामदेव गावडे, शुभांगी पाटील, वसंत पाटील, बाबासो नदाफ उपस्थित होते.कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र विभागीय सहकार वाचवा परिषद शनिवार २८ रोजी मुस्लीम बोर्डिंग दसरा चौक येथे पार पडली. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत ते ताबडतोबीने मागे घ्यावेत असा ठराव विधीमंडळात करावा असा महत्वपूर्ण ठराव परिषदेत मांडण्यात आला.

Related Stories

कोल्हापूर : रिक्षा ड्रायव्हर सीटवरून थेट सरपंचपदाच्या खुर्चीत…

Archana Banage

Archana Banage

सातवेतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सपोनि दिनेश काशीद यांच्या निलंबनाची मागणी

Archana Banage

जिल्हा युवा महोत्सव गुरुवारपासून

Archana Banage

कोल्हापूर : ‘झूम’वरील बंद पडलेला वीज निर्मिती प्रकल्प सुरू

Archana Banage

राधानगरी धरणात 28.34 टक्के पाणीसाठा

Abhijeet Khandekar